Sakal Survey 2024 Saam Digital
महाराष्ट्र

Sakal Survey 2024: राष्ट्रवादीसोबत ठाकरेंचं नुकसान? मविआत सर्वाधिक फायदा कोणाला ?; 'सकाळ'-'साम' सर्व्हेचे निष्कर्ष अनेकांची झोप उडवणारे

Maharashtra Election Survey for 2024: लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला 9 जागा मिळाल्यात. तर शिंदे गटाला 7 जागा मिळाल्या. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन ठाकरेंचं नुकसान झालंय का ? याचा कल 'सकाळ', साम टीव्हीच्या सर्व्हेतून समोर आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला 9 जागा मिळाल्यात. तर शिंदे गटाला 7 जागा मिळाल्या. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन ठाकरेंचं नुकसान झालंय का ? मविआत सर्वाधिक फायदा कोणाला झालाय? याचा कल 'सकाळ', साम टीव्हीच्या सर्व्हेतून समोर आला आहे. पाहूया एक रिपोर्ट...

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. पण आता आगामी विधानसभा निवडणुकीत या आघाडीची स्थिती कशी राहिल ? तसंच मविआत घटक पक्षांमध्ये कोण सरस ठरलंय? आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन उद्धव ठाकरेंचं नुकसान झालंय का? याचा कल 'सकाळ', साम टीव्हीच्या सर्व्हेतून समोर आला आहे. यातील निष्कर्ष अनेकांची झोप उडवणारे आहेत.

सकाळ आणि सामनं राज्यातील सर्व 288 मतदारसंघात सर्व्हेक्षण केलं. यामध्ये एकूण 81,529 मतदारांची मतं जाणून घेण्यात आली. यामध्ये 68 टक्के पुरुष तर 31 टक्के महिलांचा तसंच 1 टक्के इतरांचा समावेश आहे. या मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिला असला तरी या आघाडीत कोणता घटक पक्ष सरस ठरेल? याचं उत्तर देताना काँग्रेस या पक्षाचं नाव मतदारांनी घेतलं आहे.

काँग्रेसला 37.1 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. त्यानंतर सर्व घटक पक्षांना समान फायदा झाल्याचं 30.8 टक्के लोकांनी म्हटलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला फायदा झाल्याचं 18.5 टक्के लोकांनी म्हटलं आहे. तर सर्वात कमी फायदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला झाल्याचं लोकांचं म्हणणं आहे. 13.6 टक्के लोकांनी शिवसेनेला कमी फायदा झाल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन उद्धव ठाकरे याचं राजकीय नुकसान झालंय का? या प्रश्नावर लोकांनी मत व्यक्त केलंय पाहूया काय कल आहे. 31.3 टक्के लोकांनी 'होय' असं उत्तर दिलंय. तर 43.3 टक्के लोकांनी ठाकरेंचं नुकसान झालेलं नाही असं म्हटलंय. तर 25.4 टक्के लोकांनी मविआत शिवसेनेला नुकसान झालंय की नाही हे सांगता येणार नाही, असं म्हटलं आहे.

शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंनी झंझावती दौरे करुन महाराष्ट्र पिंजून काढला. लोकांमध्ये ते गेले. त्याचा परीणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. घोडामैदान दूर नाही. लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे आत्मविश्वास वाढलेला ठाकरे गट विधानसभेत मुसंडी मारणार का ? याकडे राज्याचं लक्ष आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT