Sakal Survey 2024 Saam Tv
महाराष्ट्र

Sakal Survey 2024: महाराष्ट्रात भाकरी फिरणार का? महायुती की महाविकास आघाडी? वाचा EXCLUSIVE रिपोर्ट

Maharashtra Election Survey for 2024: आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सकाळ समूह आणि साम टीव्हीनं सर्व्हे केला आहे. यामध्ये या सर्व्हत महाराष्ट्रतल्या जनतेचा मूड काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Satish Kengar

आज विधान परिषदेसाठी मतदान पार पडलंय. काही तासांमध्ये याचे निकाल जाहीर होणार आहे. मात्र यासह राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षानं विधानसभेसाठी कंबर कसलीये. आजचा दिवस तसा खास आहे. कारण विधान परिषदेचे निकाल आजच येणार आहेत. परंतु विधानसभेच्या निवडणुकीचा कल आज साम टीव्हीच्या हाती आलायं. आतापर्यतचा मराठी न्यूज चॅनलच्या इतिहासात सर्वात मोठा सर्व्हे सकाळ समूह आणि साम टीव्हीनं केलाय. तब्बल 84 हजार 529 मतदारांशी संवाद साधून हा सर्व्हे करण्यात आलाय.

या सर्व्हत महाराष्ट्रतल्या जनतेचा मूड काय आहे, हे समोर आलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि मुख्यमंत्री पदासाठी कोणाला पसंती मिळणार, हेही यातून समोर आलं आहे. विशष म्हणजे हा सर्व्हे राज्यात लाडकी बहिण योजना लागू करण्यात आली त्यावेळस करण्यात आला आहे.

कसा करण्यात आला सर्व्हे?

सर्वेक्षणासाठी संमिश्र संशोधन पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे. राज्यभरातून २८८ विधानसभा मतदारसंघातून ८४५२९ मतदारांशी संवाद साधण्यात आला. त्यासाठी सकाळचे दोन हजारांवर सहकारी सहभागी झाले होते. मतदारांची निवड करतांना ४८ लोकसभा मतदारसंघांना २८८ विधानसभा मतदारसंघात विभागण्यात आले. पुढे शहरी आणि ग्रामीण भागांची प्रभाग आणि जिल्हा परिषद गट अशी विभागणी करण्यात आली. भौगोलिक समतोल राखून संशोधन नमुने निवडण्यात आले आहेत. यासाठी स्तरीय यादृच्छिक नमुना (Stratified Random Sampling) संशोधन पद्धत वापरण्यात आली.

यादृच्छिक नमुना पद्धतीने लिंग, वय, आर्थिक उत्पन्न गट, नोकरी व्यवसाय, शिक्षण, धर्म, जात या स्तरातून नमुना निवड करण्यात आली आहे. नमुना निवड करतांना मतदार असलेल्या आणि लोकसभेला (२०२४) मतदान केलेल्या नागिरकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. महाराष्ट्रभरातून यापैकी ६८ टक्के पुरुष तर ३१ टक्के महिल आणि १ टक्के इतर राहिलेत.

विधानसभा निवडणुकीत आपली पसंती कोणाला?

या सर्व्हेत आम्ही प्रश्न विचारला की, विधानसभा निवडणुकीत आपली पसंती कोणाला? यात ४८.७ टक्के लोकांनी महाविकास आघाडीला आपली पसंती दर्शवली आहे. तर महायुतीला ३३.१ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर यापैकी कोणी नाही असं ४.९ टक्के लोकांचं म्हणणं आहे, अद्याप ठरवलं नाही असं १३. ४ टक्के लोकांचं म्हणणं आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या सर्वेक्षणाच्या सखोल विश्लेषणासाठी उद्याचा 'सकाळ' वाचा!

Sakal Survey 2024

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT