9 years of Modi Government Sakal Survey Saam Tv
महाराष्ट्र

Sakal-Saam Mahasurvekshan: कसा होता मोदी सरकारचा 9 वर्षांचा कारभार? जनता खुश की नाराज? सकाळच्या 'महासर्वेक्षणा'त समोर आली मोठी गोष्ट

कसा होता मोदी सरकारचा 9 वर्षांचा कारभार? जनता खुश की नाराज? सकाळच्या 'महासर्वेक्षणा'त समोर आली मोठी गोष्ट

Satish Kengar

9 years of Modi Government Sakal Survey: वर्ष 2014 मध्ये भाजप नरेंद्र मोदी यांचा चेहरा घेऊन सत्तेत आलं. 2019 ची लोकसभा निवडणूकही पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने लढवली आणि विजय मिळवला. सलग 9 वर्ष नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी आहेत. एकच पंतप्रधान एकच पक्षाची सत्ता गेल्या अनेक वर्षानंतर देशात असल्याचं दिसून आलं आहे.

आपल्या ९ वर्षाच्या कार्यकाळात मोदी सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. याचा मोठा परिणाम देशावर झाला आहे. मोदी सरकाराच्या निर्णयावरून अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्ही न्यूज यांनी 'महासर्वेक्षण' (Sakal-Saam Survekshan) केलं आहे.

मोदींचा 9 वर्षांचा कारभार कसा राहिला? यावर जनता खुश आहे की नाराज, कोणत्या मुद्द्यावर जनतेचा सर्वाधिक रोष आहे आणि मोदींनी निर्णय घेतलेले कोणते मुद्दे जनतेला आवडले आहेत. हे या महासर्वेक्षणात समोर आलं आहे. (Sakal Survey on Narendra Modi Government Nine years)  (Latest Political News)

कसा करण्यात आला सर्वेक्षण?

सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण होत आहेत. यातच केंद्रातील योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, हा त्यांचा अजेंडा आहे. ते खूप प्रकर्षणाने त्यांनी केलेली कामे मांडतात. त्यामुळे लोकांना या सगळ्याबद्दल काय वाटतं, तसेच 2019 मध्ये सलग दुसऱ्यांदा मोदींच्या नेतृत्वात भाजपचं सरकार केंद्रात सत्तेत आलं. यातच मोदींच्या प्रतिमेबद्दल लोकांना काय वाटतं? ती लोकप्रियता अजून टिकून आहे का? 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर याचा कसा परिणाम होणार आहे. याबद्दल सर्वेक्षणाच्या माध्यमातून लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

या सर्वेक्षणात एकूण 24 प्रश्न होते. यात संपूर्ण राज्यभरातून 288 विधानसभा आणि 48 लोकसभा मतदार संघात हा सर्वेक्षण करण्यात आला आहे. सकाळच्या 2 हजारांहून अधिक सहकाऱ्यांनी एकूण 49231 लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधून हे सर्वेक्षण केलं आहे.

या सर्वेक्षणात आम्ही प्रश्न विचारला होता की, पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या 9 वर्षांच्या काळातील सर्वाधिक यशस्वी कामगिरी कोणती? याबद्दल खालील प्रमाणे लोकांनी आपली मते मांडली आहेत.

• कोव्हिड१९ च्या काळातील काम / कोरोना लसीकरण: 24.8 %

• देशाची अर्थव्यवस्था: 10.6 %

• शेतकऱ्यांचे उपन्न: 4.6%

• रस्ते-रेल्वे-विमान-जलवाहतूक: 8.3%

• उद्योग-व्यापार: 4.3%

• केंद्र-राज्य संबंध: 2%

• संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता: 7%

• वरीलपैकी सर्वत्र यशस्वी ठरले: 13.9%

• वरीलपैकी कोठेही यशस्वी ठरले नाहीत: 24.3%

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचे योगदान कोणते आहे, असे आपल्याला वाटते?

• भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावली: 20.6 %

• केंद्र सरकारच्या योजना: 4.9 %

• राम मंदिर: 12.9%

• नोटबंदी: 4.6%

• ३७० कलम रद्दद करणे: 11%

• संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता: 3.5%

• वरीलपैकी सर्व: 12.2%

• यापैकी कोणतेही नाही: 16.1%

• सांगता येणार नाही: 9.7%

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT