- सुशिल थाेरात
Maratha Kranti Morcha Latest Updates : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (antarwali sarathi) येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) उपोषणास बसलेल्या आंदाेलकांवर केलेल्या लाठीहल्लाचा निषेध नाेंदविण्यासाठी उद्या (मंगळवार) नगर जिल्ह्यातील काेपर्डेी येथे ग्रामस्थ उपाेषणास बसणार आहेत. दरम्यान उद्या काेल्हापूर आणि माळशिरस जिल्ह्यात सकल मराठा समाजाने बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. (Maharashtra News)
जालनाच्या लाठीचार्जच्या घटनेच्या निषेर्धात हे उपोषण नगरच्या कोपर्डी येथे निर्भयाच्या समाधीजवळ उद्यापासून करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती कोपर्डीतील ग्रामस्थांनी दिली. ग्रामस्थ म्हणाले मराठा क्रांती मोर्चाची कोपर्डीतूनच सुरुवात झाली हाेती.
...म्हणून मराठा तरुणांचा संयम सुटला
दरम्यान राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत कुठल्याच हालचाली न केल्यामुळे आजची परिस्थिती उदभवल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले. एक वर्षापासून शिंदे सरकार सत्तेत आलेले आहे. मात्र या सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात कोणतीही बैठक घेतली नाही.
आंदोलन चिघळल्यानंतर आज घाईघाईत बैठक घेण्याचा घाट घातला जात आहे. मुख्यमंत्री या मराठा आरक्षण समितीचे सदस्य होते. तरी देखील त्यांनी वर्षभरापासून काहीच केलं नाही अखेर मराठा तरुणांचा संयम सुटला असं देखील थोरात यांनी म्हटलं आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.