sakal maratha samaj celebration in solapur, msrtc saam tv
महाराष्ट्र

Maratha : सकल मराठा समाजाचा जल्लाेष; युवकांचा आनंद गगनात मावेनासा झाला

अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर युवकांना नियुक्तीपत्रे मिळाली.

विश्वभूषण लिमये

Solapur News : सोलापूर (solapur) जिल्ह्यातील ३३६ तरुणांना (youth) राज्य परिवहन महामंडळातील (msrtc) चालक (driver) आणि वाहक (conductor) पदावरील नियुक्तीची पत्रे मिळाली. या निर्णयाचे सकल मराठा समाजाने (sakal maratha samaj) रात्री उशिरा स्वागत करीत जल्लोष केला.

अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर युवकांना नियुक्तीपत्रे मिळाली. ही नियुक्तीपत्रे मिळाली नसती तर पुन्हा मोलमुजरी करावी लागली असती अशी भावना अनेक युवकांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केल्या. आज आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे असेही युवकांनी नमूद केले. (Maharashtra News)

राज्य परिवहन महामंडळाने २०१९ मध्ये भरती प्रक्रिया राबविली होती. कधी आरक्षण तर कधी कागदपत्रांची पडताळणी या नावाखाली नियुक्तीपत्रे रखडली होती. या प्रश्नावर सकल मराठा समाजाने आंदोलन (aandolan) केले होते. अखेर चार टप्प्यांत यातील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याचे काम सुरु झाले.

या निर्णयाचे स्वागत करीत सकल मराठा समाजाने जल्लोष केला. छत्रपती शिवरायांच्या (chhatrapati shivaji maharaj) पुतळ्यावर पुष्पवृष्टी करत हलग्या लावून, फटाके फोडत (firecrackers), पेढे (sweets) वाटून युवकांनी आनंद व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

Pakistan Attack News : लेफ्टनंट कर्नल, मेजरसह लष्काराच्या ११ जवानांचा मृत्यू; पाकिस्तान दहशतवादी हल्ल्याने हादरला

ICC Rankings: ICC टेस्ट रँकिंगमध्येही सिराज-जडेजाचा कहर; नंबर 1 ताजही बुमराहकडे कायम, 'या' फलंदाजाचं मोठं नुकसान

Sachin Pilgaonkar: 'मी उर्दूसोबत झोपतो, रात्री ३ वाजता उठवलं तरीही उर्दूमध्येच...; सचिन पिळगांवकरांचे पुन्हा एक वकव्य चर्चेत

Retirement Planning: EPF, NPS की PPF; कोणत्या योजनेत मिळणार सर्वाधिक परतावा? कॅल्क्युलेशन वाचा

SCROLL FOR NEXT