Solapur News : साेलापूरात वाहतुकदारांसाठी नवे नियम; आजपासून अंमलबजावणी

मागील काही दिवसांपासून शहरात जड वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात होती.
solapur, new traffic rules, police
solapur, new traffic rules, policesaam tv

Solapur News : सोलापूर शहरातून जाणारी जडवाहतूक सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद करण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी बोलाविलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसाठी एक ट्रॉलीचा नियम करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या नव्या नियमांची (rules) आजपासून (बुधवार १ फेब्रुवारी) अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

solapur, new traffic rules, police
Pandharpur Maghi Yatra : विठुनामाच्या जयघोषांनी पंढरी दुमदुमली; माघी यात्रे निमित्त लाखाे भाविक दर्शन रांगेत

शहर पोलिस (police) आयुक्तालयात जिल्हा प्रशासन, शहर पोलिस, महापालिका, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग, बांधकाम विभाग आदी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून शहरात जड वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांची (accident) संख्या दिवसेंदिवस वाढत जात होती. त्यात अनेक लहान मुलांचा बळी गेला. (Solapur Latest Marathi News)

solapur, new traffic rules, police
Parbhani News: रील बनवणं बेतले जीवावर, दाेन विद्यार्थ्यांचा मृत्यू; डाकू पिंपरी गावावर शाेककळा (व्हिडिओ पाहा)

शहरातील जड वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी शहरातील युवक (youth) एकत्रित येत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिस प्रशासनाने पुढाकार घेत सर्व विभाग प्रमुखांची बैठक बोलाविली. त्यात नवे नियम करण्याचा निर्णय घेतला.शहरातील जड वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या कमी करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.

दरम्यान शहरातील जड वाहतूक धावत असताना त्या वाहनांचा वेग प्रती तास २० किलोमीटर वेगाने धावणार आहे. त्यापेक्षा जास्त वेगात वाहने पळविल्यास त्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com