Chhagan Bhujbal Death Threat News saam tv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : मराठा समाज छगन भुजबळांविरोधात आक्रमक; नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौराच बदलला

Chhagab Bhujal vs Maratha Samaj : छगन भुजबळ आज येवला आणि निफाड तालुक्यातील अवकाळीच्या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. मात्र सकल मराठा समाजाने त्यांच्या या दौऱ्याला विरोध केला आहे.

प्रविण वाकचौरे

Nashik News :

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर सातत्याने टीका करणारे आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करणाऱ्या छगन भुजबळ यांना मराठा बांधवांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. छगन भुजबळ आज येवला आणि निफाड तालुक्यातील अवकाळीच्या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. मात्र सकल मराठा समाजाने त्यांच्या या दौऱ्याला विरोध केला आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी आपल्या दौऱ्याचा मार्ग बदलला आहे.

बुधवारी रात्रीपासूनच येवला तालुक्यातील काही गावात भुजबळांना विरोध करण्यासाठी मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते. आज सकाळी देखील विंचूर चौफुली येथे अनेक मराठा बांधव एकत्र जमले आहेत. मराठा बांधवांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर येवल्यातील भुजबळांच्या संपर्क कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छगन भुजबळ नुकसानग्रस्त (Farmer) भागाची पाहणी करण्यासाठी निघाले आहेत. विंचूर चौफील येथे मराठा जमले असल्याने पोलिसांच्या विनंतीनंतर छगन भुजबळ यांनी आपल्या दौऱ्याचा मार्ग बदलला आहे. आता दुसऱ्या मार्गाने भुजबळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी निघाले आहेत. मराठा बांधवांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. (Tajya Batmya)

छगन भुजबळ काय म्हणाले?

नुकसानग्रस्त गावांमधील ९० टक्के लोकांना गावात जाऊन मदत मिळवून द्यावी असं वाटत आहे. ज्यांनी विरोध केला तिथे जाणार नाही. सर्व ठिकाणी जाऊ शकणार नाही. पण काही ठिकाणी पाहणी केल्यानंतर अंदाज येतो. सरकारी कागद आणि त्याची नुकसानीची माहिती येईलच, पण शेतकऱ्यांना आधार द्यावा लागतो, सरकार तुमच्यासोबत आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

मी इथला आमदार आहे, मला जावंच लागेल. ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी राजकारण करा, मी माझं काम करणार आहे. निवडणुकीच्या वेळी काय ते पहा ना, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trump Tariffs: रशियाशी दोस्ती खटकली; डोनाल्ड ट्रम्प यांची सटकली; अमेरिका भारताच्या वस्तूंवर लावणार 25 टक्के टॅरिफ

Matar Bakarwadi : संध्याकाळच्या नाश्त्याला उपमा पोहे कशाला? झटपट करा खुसखुशीत बाकरवडी

Pune News: धक्कादायक! कारगिल युद्ध लढलेल्या सैनिकाकडे मागितला नागरिकत्त्वाचा पुरावा; घरात घुसून ८० जणांच्या टोळक्याकडून शिवीगाळ

Mumbai Shocking News : शिक्षक की राक्षस? खराब अक्षरामुळे ८ वर्षांच्या मुलाला दिले मेणबत्तीचे चटके

Maharashtra Live News Update: अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावला

SCROLL FOR NEXT