राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं (Farmer) मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे हिरावला आहे. उशी पिकं आडवी झाली आहे. मात्र शेतकऱ्याचं संकट इथंच संपलेलं नाही. कारण राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात मिचांग हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील 3 दिवस राज्यात पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान विभागाने पावसाची आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. विदर्भातही विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता वर्तवली आहे. (Tajya Batmya)
हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने आज यलो अलर्ट दिला आहे.
या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.
तसेच रायगड, ठाणे, जालना आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.