sairat fame suraj pawar  saam tv
महाराष्ट्र

'सैराट' फेम प्रिन्स सूरज पवारच्या फसवणूक प्रकरणात अडचणी वाढणार? पोलीस चौकशीला राहिला गैरहजर

फसवणूक प्रकरणात पोलिसांनी चौकशीसाठी आज, सोमवारी बोलावलं होतं. मात्र, सुरज पवारने पोलीस चौकशीला दांडी मारली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

Ahmednagar crime news : नोकरीचे आमीष दाखवून फसवणूक केल्याच्या प्रकरणात सैराट फेम प्रिन्स अर्थात अभिनेता सूरज पवार याचं नाव समोर आलं होतं. याच प्रकरणात पोलिसांनी चौकशीसाठी आज, सोमवारी बोलावलं होतं. मात्र, सुरज पवारने पोलीस (Police) चौकशीला दांडी मारली आहे. त्यामुळे सूरज पवारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवून नेवासा तालुक्यातील युवकाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी चार आरोपींनी पोलिसांना अटक केली आहे. या चौघांच्या चौकशीदरम्यान अभिनेता सूरज पवारचे नाव समोर आलं होतं. त्यामुळे राहुरी पोलिसांनी शुक्रवारी पोलिसांनी बोलावले होते.

सोमवारी बँक डिटेल्स आणि डिटेल्स काही कागदपत्रांसह पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते. मात्र, आज, सोमवारी सूरज पवार चौकशीला गैरहजर राहिला. सूरज तब्येत ठीक नसल्याने तो आजच्या ऐवजी उद्या हजर राहील, अशी विनंती सूरजच्या वकिलांनी केल्याची माहिती राहुरी पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान , सदर प्रकरणात सूरज पवारचे नाव आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आता उद्या सूरज राहुरी पोलिसांसमोर चौकशीला हजर राहणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र, कागदपत्रांत त्रुटी किंवा तपासात सहकार्य नसल्यास सूरजला अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5-6 Gram Mangalsutra Designs: सणासुदीसाठी 5-6 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, हे लेटेस्ट 6 पॅटर्न्स तुम्हाला आवडतील

Maharashtra News Live Update: सचिन वाझेने केलेलं कृत्य हे दहशतवादी कृत्यच, कारण त्यात स्फोटकांचा वापर झाला: एनआयएचा दावा

Maharashtra : चारा बियाण्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय, ही अट रद्द; जाणून घ्या कुणाला होणार फायदा?

Diwali Bonus: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी सरकारकडून बोनस जाहीर, इतके पैसे मिळणार?

खासदारावर वाहनावर दगडफेक, लोखंडी रॉडने कार फोडली; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT