shirdi, sai baba saam tv
महाराष्ट्र

Shirdi Sai Baba Punyatithi 2022 : 'साईं' च्या पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ; साईबाबांच्या जीवनावर उभारला देखावा

उद्या उत्सवाचा मुख्य दिवशी साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहाणार आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन बनसोडे

Sai Baba : देश विदेशातील करोडो भाविकांचे (devotees) श्रद्धास्थान असणाऱ्या साईबाबांच्या (Sai Baba) पुण्यतीथी उत्सवाला शिर्डीत (Shirdi) मोठ्या भक्तिमय वातावरण सुरुवात झाली. आजपासून सात ऑक्टोबर असे चार दिवस हा उत्सव साजरा केला जाणार आहे. या निमित्त साई संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. (Maharashtra News)

shirdi sai baba temple

आज उत्सवाचा पहिला दिवस असून साई प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विणा, मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी पोथी आणि रुग्‍णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉ. शैलेश ओक तसेच सामान्‍य प्रशासन प्रभारी अधिक्षक नवनाथ कोते यांनी प्रतिमा घेवुन सहभाग घेतला. (Shirdi Sai Sai Baba Punyatithi Utsav 2022)

प्रातांधिकारी गोविंद शिंदे, तहसिदार कुंदन हिरे, मुख्‍य लेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी कैलास खराडे, संरक्षण अधिकारी आणासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, पुजारी, कर्मचारी, साईभक्त आणि ग्रामस्थ यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते. (साईबाबा पुण्यतिथी उत्सव 2022)

sai baba temple shirdi

साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त अखंड पारायणास सुरवात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी प्रथम व व्दितिय अध्यायाचे वाचन केले. तर समाधी मंदिरात तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व त्‍यांच्या सुविद्य पत्‍नी दिपाली भोसले यांच्‍या हस्‍ते साईबाबांची पाद्यपूजा करण्‍यात आली.

sai baba

उत्‍सवानिमित्‍त मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने करण्‍यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई व सर्व धर्म समभावाची शिकवण देणारा साईबाबांच्या जीवनावर आधारीत मनमोहक असा भव्य देखावा भाविकांसाठी पर्वणी ठरतोय. त्याचप्रमाणे हैद्राबाद येथील देणगीदार साईभक्‍त ए. महेश रेड्डी यांच्‍या देणगीतुन मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

उद्या उत्सवाचा मुख्य दिवशी साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले राहाणार असल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT