महाराष्ट्र

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

Sahyadri Express Robbery : कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसमध्ये दरोडा पडला आहे. रेल्वे सिग्नलमध्ये फेरफार करून प्रवाशांकडील मौल्यवान वस्तू लुटल्यात आले.

Bharat Jadhav

  • सह्याद्री एक्सप्रेसवर मध्यरात्री दरोडा

  • सिग्नलमध्ये बिघाड करून गुन्हा

  • प्रवाशांचे सोने आणि मोबाईल लुटले

सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये मध्यरात्री सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा पडला आहे. रेल्वेच्या सिग्नलमध्ये बिघाड करून दरोडा घालण्यात आला. कराड तालुक्यातील शेणोली स्टेशन परिसरातील घटनेने खळबळ उडाली आहे. मिरज लोहमार्ग पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेस शेणोली स्टेशनजवळआली असता दरोडा पडला. सातारा आणि सांगली जिल्हा हद्दीपासून काही अंतरावर घटना घडली आहे.

सिग्नलशी संशयितांनी छेडछाड करत सिग्नल बंद पडला होता. सिग्नल बंद असल्याने रेल्वे थांबली त्यानंतर दरोडेखोर रेल्वेमध्ये शिरले त्यांनी प्रवाशांचे सोने आणि मोबाईल फोन लुटून नेले. काही प्रवाशांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण हत्यारांचा धाक दाखवत त्यांना लूटले.घटनेनंतर माहिती समजताच मिरज लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर सह्याद्री एक्स्प्रेस विलंबाने पुण्याच्या दिशेने रवाना झाली.

अंबाजोगाई-लातुर महामार्गावरील टोलनाक्याची तोडफोड

बीडच्या सेलुअंबा येथील अंबाजोगाई-लातुर महामार्गावरील टोलनाक्यावर काल रात्री 1.20 वाजता काही अज्ञातांनी हॉकीस्टिक आणि धारदार शस्त्राने हल्ला करत टोलनाक्याची तोडफोड केली. आमच्याकडून कधीच टोल घ्यायचा नाही, असं म्हणत त्यांनी तोडफोड केली. या अज्ञातांनी कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केली. तर एका व्यक्तीने व्हिडिओ काढत कर्मचाऱ्यांना धमकावले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तोडफोडीचे फुटेज समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT