कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार Saam TV
महाराष्ट्र

कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार

सोनालींनी यापूर्वी अनेक पुस्तकांचे भाषांतर केलं असून त्या स्वतंत्र लिखाण ही करतात.

अनिल पाटील

कोल्हापूर: साहित्य अकादमीचे आज अनुवाद पुरस्कार जाहीर करण्यात आले. मराठी भाषेत हा पुरस्कार सोनाली नवांगुळ यांनी केलेल्या 'मध्यरात्री नंतरचे तास' या अनुवादित कादंबरीला जाहीर करण्यात आला असून, सलमायांच्या मूळ तमिळ भाषेतील कादंबरीचा हा अनुवाद आहे. सोनालींनी यापूर्वी अनेक पुस्तकांचे भाषांतर केलं असून त्या स्वतंत्र लिखाण ही करतात. स्मृतिचिन्ह, 50 हजार रुपये रोख व मानपत्र अशा स्वरूपात हा पुरस्कार दिला जातो. तर जयश्री शानभाग यांनी कोकनीत अनुवादित केलेल्या 'स्वप्न सारस्वत' कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

पोर्तुगीज धर्मछळानंतर 1560 साली गोव्यातील 22 हजार कुटुंबे धर्म आणि देव रक्षणासाठी कर्नाटक आणि केरळ राज्यात परागंदा झाली. याच ऐतिहासिक घटनांवर आधारित मूळ गोपालकृष्ण पै यांच्या कन्नड भाषेतील 'स्वप्न सारस्वत' या कादंबरीच्या म्हैसूर स्थित कोकणी लेखिका जयश्री शानभाग यांनी केलेल्या कोंकणी अनुवादाला केंद्रीय साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार आज जाहीर करण्यात आला.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gujrati actress On Election: गाफील राहून चालणार नाही...; गुजराती अभिनेत्रीचा अस्खलित मराठीमध्ये मोलाचा सल्ला

CM Devendra Fadnavis: माझ्या बोटावरची शाई पुसत नाही, राज ठाकरेंच्या आरोपावर CM फडणवीसांचे उत्तर

Municipal Elections Voting Live updates : उमेदवाराची पोलिसांसोबत बाचाबाची

मार्कर शाई पुसलीच जात नाही, फेक नरेटिव्ह पसरवला जातोय, आयोगाकडून स्पष्टीकरण, वाचा नेमकं काय म्हणाले...

Kiss And Smile Face Yoga: नियमित करा 'किस अँड स्माईल' योगा, अवघ्या २ दिवसांत होईल चेहरा गोरा

SCROLL FOR NEXT