Devendra Fadnavis in Sahakar Parishad saam tv
महाराष्ट्र

Sahakar Parishad: सहकार परिषदेत फडणवीसांनी मानले अमित शाहांचे आभार, सकाळ माध्यम समूहाचंही केलं कौतुक

Sahakar Parishad: देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अमित शाह यांचा उल्लेख भारत सरकारचे कर्मठ आणि कर्तव्यनिष्ठ गृहमंत्री असा केला.

Chandrakant Jagtap

Sahakar Parishad: सकाळ माध्यम समूहाच्या वतिने बँकींग व साखर उद्योगासाठी सहकार महापरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारीता मंत्री अमित शाह यांचे आभार मानले.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अमित शाह यांचा उल्लेख भारत सरकारचे कर्मठ आणि कर्तव्यनिष्ठ गृहमंत्री असा केला, तर एकनाथ शिंदे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्री असा उल्लेख केला. फडणवीस म्हणाले, गेल्या काही वर्षात सहकार क्षेत्राची भरभराट झाली. अमित शाह यांनी चांगले निर्णय घेतलेत. (Latest Marathi News)

अमित शाह हे सहकार क्षेत्रातील नेतृत्व आहे. त्यांच्या सुरूवातीचा काळात त्यांनी जिल्हा बँक सांभाळली आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा सहकार क्षेत्रातल्या अडचणी घेऊन जात होतो तेव्हा त्यांनी तातडीने उपाययोजना केल्या. सहकारी कारखान्यावर टांगती तलवार होती. कोर्टात अडचणी होत्या, तेव्हा त्यांनी तातडीने निर्णय घेऊन प्रश्न संपवला. (Latest Political News)

सहकार मंत्री ते आत्ता झाले पण ग्रुप ऑफ मिनिस्टरचे प्रमुख ते कायमच होते. सहकार ताठ मानेने उभा आहे, कारण त्यांनी निर्णय घेतले. या सर्व निर्णयासाठी त्यांचे आभार असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी फडणवीस यांनी सकाळ समूहाचे देखील कौतुक केले. सकाळ समूहाने आयोजित केलेल्या या सहकार परिषदेची प्रशंसा करत फडणवीस यांनी समूहाच्या कार्याचे कौतुक केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Fort History: रायगड किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Shweta Tiwari: मुंबईत कुठे राहते श्वेता तिवारी? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांविषयी बोलताना आमदार सदाभाऊ खोत धाय मोकलून रडले|VIDEO

Maharashtra Politics: महायुतीमध्ये ठिणगी! जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील यांच्यात खडाजंगी

SCROLL FOR NEXT