Video : 'केंद्रीय गृहमंत्री जास्त बोलत नाहीत, फटक्यात...'; CM शिंदेंनी केली अमित शहांची तोंडभरून स्तुती

सकळतर्फे होणाऱ्या ‘सकाळ महाकॉन्क्लेव्ह’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे तोंडभरून कौतुक केले.
Eknath Shinde
Eknath Shinde Saam tv
Published On

Eknath Shinde News : सकळतर्फे होणाऱ्या ‘सकाळ महाकॉन्क्लेव्ह’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे तोंडभरून कौतुक केले. 'अमित शहा जास्त बोलत नाहीत. फटक्यात काम करून टाकतात. ते ऑपरेशन करतात, तेव्हा कळत नाही की कधी झालं आणि कधी संपलं. कधी यशस्वी झालं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची तोंडभरून स्तुती केली. (Latest Marathi News)

कालपासून माध्यम समूहाच्या वतीने बँकींग व साखर उद्योगासाठी सहकार महापरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तोंडभरून कौतुक केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ' सहकार महापरिषदेत काही तरी चांगलं घडेल. सहकारी चळवळीचे विकासात मोठे योगदान आ

Eknath Shinde
Sahakar Parishad: सहकार परिषदेत फडणवीसांनी मानले अमित शाहांचे आभार, सकाळ माध्यम समूहाचंही केलं कौतुक

अमित शहा (Amit Shah) यांची स्तुती करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'अमित शहा यांना ज्यावेळी अडचणी सांगितल्या. त्यावेळी त्यांनी सांगितलं 'हो जाएगा'. ते जास्त बोलत नाहीत. फटक्यात काम करून टाकतात. ते ऑपरेशन करतात. तेव्हा कळत नाही. कधी ऑपरेश झालं,कधी संपलं. कधी यशस्वी झालं'.

Eknath Shinde
Prakash Ambedkar On Uddhav Thackeray | वादाचा निवाडा करणं आयोगाचं काम नाही - आंबेडकर

'महाराष्ट्राला त्यांच्यकडून भरपूर आशा आहेत. आम्ही त्यांच्या आशेवर आहोत. तसेच साखर निर्यातीबाबत देखील निर्णय घेऊ. त्यात तु्मच्या सहयोगाची आवश्यकता आहे.राज्य सरकार तुमच्या मार्गदर्शनात आम्ही काम करतोय. या क्षेत्रात क्रांती होईल. तुम्ही आम्हाला त्यावेळी सांगितले होते, तुम्हाला साथ देणार. तुम्ही खूप काही बोलला होता. आता त्याच्यापेक्षा जास्त करत आहात, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com