Solapur Crime News saam tv
महाराष्ट्र

Solapur Crime News : हनुमान मंदिरात गांजा ओढण्यास विरोध, महंतावर हल्ला; सोलापूरातील साधू, महंत आक्रमक

पाेलिसांनी घटनेचा सखाेल तपास करावा अशी मागणी साधू, महंत यांनी केली आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur News : सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या हनुमान मंदिरवजा मठात गांजा ओढण्यास हरकत घेतल्यामुळे समाजकंटकांच्या टोळक्याने महंतावर सशस्त्र हल्ला केला आहे. हा प्रकार घडल्यानंतर जखमी महंतास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra News)

राम कृपाळू दास महाराज असे जखमी महंताचे नाव आहे.एसटी बसस्थानकापासून (msrtc bus) जवळच असलेल्या मुरारजी पेठेत निराळे वस्ती रस्त्यावर राज राजेश्वरी हनुमान मंदिर आहे.या मंदिरात साधूंचा मठ असून तेथे देशाच्या विविध भागातून आलेले साधू, महंत वास्तव्य करतात.

या मठात भाविकांची वर्दळ असते. परंतु काही समाजकंटकांचे टोळके गांजा ओढण्यासाठी मठात घुसखोरी करतात. साधू, महंत आणि भाविकांचा विरोध झुगारून गांजा ओढण्याचा समाजकंटकांचा कार्यक्रम सुरूच असतो. त्यांना गांजा ओढण्यास विरोध करून मंदिरातून हाकलण्याचा प्रयत्न केला.

याचा राग धरुन समाजकंटकांनी महंत राम कृपाळू दास महाराजांवर सशस्त्र हल्ला केला. यात त्यांच्या गळ्यावर आणि हनुवटीवर गंभीर जखमी (injured) झाले. त्यांच्यावर हल्ला होताना इतर साधूंनी तात्काळ धावून येत हल्लेखोर समाजकंटकांच्या तावडीतून महंतांची सुटका केली.

धरणे आंदाेलनाचा इशारा

यासंदर्भात संबंधित साधूंनी प्रसार माध्यमांशी बोलताना पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात यापूर्वी तक्रार देऊनसुध्दा कारवाई होत नाही. संबंधित समाजकंटकांवर कठोर कारवाई न झाल्यास मोर्चा काढून धरणे आंदोलन (aandolan) करण्याचा इशारा साधूंनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ३ दिवसांपासून शिंदे शहांच्या दारात, शिवसेना नावाला कलंक लावला - संजय राऊथ

Government Job: समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी; २१९ जागांवर भरती; पात्रता काय? जाणून घ्या

David Warner: डेव्हिड वॉर्नरवरील लाईफटाईम बॅन हटवला! आता कर्णधार होण्यासही सज्ज

NCP Ajit Pawar : अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर; सात नावांचा समावेश

Armaan Malik: युट्युबर अरमान मलिकने केलं चौथं लग्न? करवा चौथच्या त्या व्हिडीओमुळे एकच चर्चा

SCROLL FOR NEXT