Sadabhau Khot Saam Tv
महाराष्ट्र

वसूलीचा आकडा न ठरल्याने म्हाडाची परीक्षा पुढं गेली : सदाभाऊ खाेत

म्हाडाची परीक्षा पुढे ढकलल्याने राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या विराेधात रान पेटलं आहे.

विजय पाटील

सांगली : रयत क्रांती संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना खाेत यांनी शरद पवारांकडून चेल्यांच्या मुसक्या आवळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. म्हाडाची परीक्षा (MHADA exams postponed) पुढे गेल्याने राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्या कारभारावर ताशेरे आेढले जाताहेत.

सदाभाऊ म्हणाले आराेग्य भरतीच्या पेपर फुटी प्रकरणात टोपे (rajesh tope) यांच्या टोपीखाली बरंच काही दडल आहे. एकतर टोपेंनी राजीनामा दयावा किंवा पुन्हा परीक्षा घ्यावेत. पुन्हा परीक्षा नाही घेतल्या तर येत्या अधिवेशनात सरकारला आम्ही जाब विचारणार आहाेत. आता म्हाडाची परीक्षा (Mhada Recruitment postponed) पुढं गेली. वसूलीचा आकडा ठरला नसेल. त्यामुळे आव्हाडांनी परीक्षा पुढे ढकलली असणार.

चाेर चाेर मावस भाऊ आणि जाईल तेथे खाऊ अशी परिस्थिती आहे राज्यात. पवार साहेब तुमच्या चेल्यांना जरा आवरा. त्यांना सांगा खायचे जरा बंद करा. महाराष्ट्रातील जनता तुमच्या वागण्यामुळे आत्महत्या करायला लागली आहे असे खाेत यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gas Cylinder: इंधनाचा प्रश्न लवकरच सुटणार? PM मोदींनी उचललं मोठं पाऊल; इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत नेमकी काय चर्चा झाली?

Besan Face Pack For Tan Removal Skin: चमकदार त्वचेसाठी लावा 'बेसन फेस पॅक', टॅनिंगही निघून जाईल

LPG cylinder shortage: गॅस सिलिंडरच्या संपला, कामगारांनी देसी जुगाड करत बनवलं जेवण; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा जनता दरबार सुरू

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT