'सेना भाजपची युती टिकविण्यासाठी 'ते' अखेरपर्यंत सक्रिय हाेते'

महाराष्ट्राला आणि देशाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मार्गदर्शन लाभत राहाे अशी भावना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
Sanjay Raut
Sanjay RautSaam TV
Published On

मुंबई (mumbai) : भाजप नेते गोपीनाथ मुंडे असते तर आज राज्याच्या राजकारण जे तुम्हांला दिसत आहे ते दिसले नसते. शिवसेना (shivsena) भाजपाची (bjp) युती टिकावी यासाठी अखेर पर्यंत ते प्रयत्न करीत राहिले. आज भाजपात गोपीनाथ मुंडे (gopinath munde) यांच्या सारखा ताेडीचा नेता नाही अशी खंत खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी व्यक्त केली. ते म्हणाले शिवसेना काय आहे हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळले होते. आम्ही त्यांच्याबराेबर २५ ते ३० वर्ष काम केले आहे. बहुजन समाजाच्या नेतृत्वची सुरुवात त्यांनीच केली असेही राऊत यांनी नमूद केले. दरम्यान महाराष्ट्राला आणि देशाला ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांचे मार्गदर्शन लाभत राहाे अशी भावना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि (कै.) गाेपीनाथ मुंडे यांचा आज वाढदिवस आहे. खासदार संजय राऊत यांनी दाेन्ही नेत्यांविषयी माध्यमांशी संवाद साधताना जून्या मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. भाजपात आज काेणाशी चर्चा करायची असा गाेपीनाथ मुंडे यांच्या सारखा नेता नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

गाेपीनाथरावांना शिवसेना कळली हाेती

ते म्हणाले भाजप नेते गोपीनाथ मुंडे असते तर आज राज्याच्या राजकारण जे तुम्हांला दिसत आहे ते दिसले नसते. शिवसेना भाजपाची युती टिकावी यासाठी अखेर पर्यंत ते प्रयत्न करीत राहिले. आज भाजपात गोपीनाथ मुंडें सारखा ताेडीचा नेता नाही अशी खंत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. ते म्हणाले शिवसेना काय आहे हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळले होते. आम्ही त्यांच्याबराेबर २५ ते ३० वर्ष काम केले आहे. बहुजन समाजाच्या नेतृत्वची सुरुवात त्यांनीच केली असेही राऊत यांनी नमूद केले.

Sanjay Raut
राणेंना जावई शोध लावायची सवय, दहा पिढ्या जातील : विनायक राऊत

शरद पवार हवेत गप्पा न मारणारे नेतृत्व

संजय राऊत यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर महाराष्ट्राला दूरदृष्टी लाभलेले नेतृत्व म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार हे आहेत असे नमूद केले. ते म्हणाले देशाचे संरक्षण मंत्री आणि कृषिमंत्री असताना आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी पहिलं पाऊल त्यांनी उचललं. त्यांचा जनतेशी थेट संवाद असताे. हवेत गप्पा न मारणारे आणि आजही तरुणांना लाजवतील असं काम करणारे नेते आहेत. राज्यात आज जो महाविकास आघाडीचा प्रयोग उत्तमरित्या सुरू आहे. तो त्यांच्या नेतृतवात सफल झाला आहे असेही राऊत यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com