Sadabhau Khot Saam Tv
महाराष्ट्र

कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का? मग कशासाठी 'हा' आटापिटा : सदाभाऊ खाेत

आजच्या परिषदेच्या माध्यमातून एक धोरण ठरवून ते राज्य आणि केंद्र सरकारकडे देणार असल्याचे खाेत यांनी स्पष्ट केले.

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

नाशिक : जीवनावश्यक वस्तूमध्ये कांदा (onion) टाकण्यात आला आहे. कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का आजपर्यंत तरी. तुम्ही तरी सांगू शकता का. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूमधून कांदा वगळावा अशी आमची मागणी आहे. ही मागणी राज्य सरकारने केंद्राकडे मांडावी असे सदाभाऊ खाेत (sadabhau khot) यांनी येथे (nashik) नमूद केले. दरम्यान राज्य सरकार हे करणार नाही कारण हे सरकार फक्त लोणी खाण्यात व्यस्त आहे अशी टीका देखील खाेत यांनी महाविकास आघाडी सरकारवर (mahavikas aaghadi) केली आहे. (sadabhau khot nashik latest marathi news)

निफाडच्या रुई गावात सन १९८२ नंतर पुन्हा कांदा परिषद होत आहे. आज (रविवार) या परिषदेत काही धाेरण ठरविली जाणार आहेत. सदाभाऊ खोत म्हणाले कधी कांदा रडवतोय कर कधी कांदा हसवतोय. निर्यात बंदी, नैसर्गिक संकट आणि इतर कारणामुळे नेहमी कांदा उत्पादक शेतकरी संकटात राहिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राजाश्रय मिळाला नाही अशी खंत व्यक्त करीत खाेत यांनी आजच्या परिषदेच्या माध्यमातून एक धोरण ठरवून ते राज्य आणि केंद्र सरकारकडे देणार असल्याचे स्पष्ट केले.

खाेत म्हणाले या धोरणावर विचार नाही झाला तर मग आरपारची लढाई लढणार. दरम्यान जीवनावश्यक वस्तूमध्ये कांदा टाकण्यात आला आहे. कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का? त्यामुळे कांदा जीवनावश्यक वस्तूमधून वगळावा ही आमची प्रमुख मागणी आहे. ही मागणी राज्य सरकारने केंद्राकडे मांडावी. मात्र राज्य सरकार हे करणार नाही कारण हे सरकार फक्त लोणी खाण्यात व्यस्त आहे अशी टीका खाेत यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT