दीड लाखांची लाच घेतल्याप्रकरणी तहसीलदारावर गुन्हा दाखल

लातूर येथील एसीबी कार्यालयात २५ मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली हाेती.
bribe
bribeSaam Tv

लातूर : अवैध वाळूचे ट्रक नियमितपणे चालू देण्यासाठी व वाळूच्या ट्रकवर यापुढे कारवाई न करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच (bribe) स्वीकारणारा निलंगा (nilanga) येथील तहसीलदार गणेश जाधव (tashildar ganesh jadhav) आणि एका व्यक्तीस लातुरच्या (latur) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. (latur latest marathi news)

या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात तहसीलदार गणेश जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नुकतेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

निलंगा येथील तहसीलदार गणेश जाधव यांच्या हद्दीतून वाळू वाहतूकीच्या गाड्या चालू करुन देण्यासाठी एका तक्रारदाराकडून प्रति ट्रक ३० हजार रुपये मागणी होत असल्याने वाळू व्यापारी त्रस्त झाले होते. अशाच एका वाळू व्यापाऱ्यास त्यांनी तीन ट्रकचे १ लाख ८० हजार रुपये मागितले. तर तडजोड अंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले. परंतु लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने लातूर येथील एसीबी (acb) कार्यालयात २५ मे रोजी तक्रार दिली.

bribe
Pandharpur Wari: पायी वारीचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी येणार 'माऊली' गावात

तहसीलदाराच्या निलंगा येथील शासकीय निवासस्थानासमोर त्यांनी सांगितलेल्या एकाने दीड लाख रुपये तहसीलदार गणेश जाधव यांच्या सांगण्यावरून स्वीकारले. त्यानूसार एसीबीने रमेश मोरगे आणि तहसीलदार गणेश जाधव यांना रंगेहात पकडले.

Edited By : Siddharth Latkar

bribe
Dhananjay Munde। राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाचे वेध; पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार: मुंडे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com