sadabhau khot criticizes raju shetti in kolhapur on fighting and andolan saam tv
महाराष्ट्र

Kolhapur: झुंडशाही, गुंडशाही विराेधात आम्ही दाेन हात करु; सदाभाऊंचा राजू शेट्टींना अप्रत्यक्ष इशारा

खाेत यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आगामी काळात खाेत आणि शेट्टी हे आमने सामने येण्याची चर्चा शेत शिवारात सुरु झाली आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

बहुजनाच्या मुलांवर हात टाकण्यापेक्षा साखर कारखानादारांच्या चेअरमनवर आपली मर्दुमकी दाखवावी. चळवळीतून अपप्रवृत्ती होत असेल तर आम्हीही दोन हात करू असा इशारा रयत शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खाेत यांनी अप्रत्यक्षपणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) नेते राजू शेट्टी (raju shetti) यांना दिला. (Maharashtra News)

ऊस आंदोलनात कांबळे नामक शेतकऱ्याला मारहाण झाली. या शेतक-याची आज (साेमवार) रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खाेत यांनी शेत शिवारात जाऊन भेट घेतली. यावेळी शेतक-यांनी घडलेला प्रसंग खाेत यांनी सांगितला.

साम टीव्हीशी बाेलताना खाेत म्हणाले शेतकरी संघटनाकडून कांबळे यांना मारहाण झाली. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. चळवळीतून अपप्रवृत्ती वाढत असेल तर आम्हीही दोन हात करू. झुंडशाही आणि गुंडशाही वाढत असेल तर आम्ही सुद्धा तयार आहाेत असेही खाेत यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खाेत यांनी राजू शेट्टींचे नाव घेतले नसले तरी त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आगामी काळात खाेत आणि राजू शेट्टी हे आमने सामने येण्याची चर्चा शेत शिवारात सुरु झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT