Sangali : मुख्यमंत्र्यांमध्ये वाघाचा एकही गुण नाही - सदाभाऊ खोत SaamTV
महाराष्ट्र

Sangali : मुख्यमंत्र्यांमध्ये वाघाचा एकही गुण नाही - सदाभाऊ खोत

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसाहेब आता तरी जरा आपल्या महालातून बाहेर या; आणि जनतेचे प्रश्न काय आहेत ते जाणून घ्या"

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : "मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसाहेब आता तरी जरा आपल्या महालातून बाहेर या आणि जनतेचे प्रश्न काय आहेत ते जाणून घ्या" कोरोना आला मास्क लावा आणि घरात बसा, आणि पळ काढा याला वाघ म्हणत नाहीत. वाघ हा डरकाळ्या फोडत जात असतो आणि तुमच्यात वाघाचे एक ही लक्षण नाही. प्रत्येकवेळी बिळात जाऊन बसता आम्ही खरा वाघ बघायला अधिवेशनामध्ये येणार आहे. अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मुख्यमंत्री उद्धव (Uddhav Thackeray) ठाकरेंवरती केली आहे. ते सांगलीच्या (Sangali) आटपाडी मध्ये बोलत होते.

हे देखील पहा -

शेतकरी, शेतमजूर आणि बाला बलुतेदार यांचे अनेक प्रश्न राज्यात आहेत. त्यामुळे हे अधिवेशन (Convention) पूर्ण झाले पाहिजे. पण हे सरकार अधिवेशन मधून सातत्याने पळ काढत आहे.

देशाच अधिवेशन महिनाभर चालतं आणि याचं पाच दिवस चालतं कारण यांना भीती वाटते यांचा भ्रष्टाचार बाहेर पडेल आणि अनेकांना मंत्री मंडळामधून बाहेर जावे लागेल. या भीतीपोटी ते अधिवेशन घेत नाहीत असा आरोपही त्यांनी राज्य सरकारवती (State Government) केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट; वाढदिवसानिमित्त शिवतीर्थावर दाखल

Karjat Tourism : डोंगर, दऱ्या अन् धबधबे; कर्जतजवळ प्लान करा दिवाळी वीकेंड, 'हे' आहे खास लोकेशन

Gold price : अवघ्या ६ मिनिटात सोनं ७,७०० रुपयांनी स्वस्त; सोन्याच्या दरात वर्षभरातील सर्वात मोठी घसरण

Thursday Horoscope: भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर ४ राशींचे नशीब बदलणार, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Mahanagarpalika Election: मुंबईत फक्त महायुती, इतर ठिकाणी स्वतंत्र; स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महायुतीचा असा प्लॅन का? काय आहे रणनीती?

SCROLL FOR NEXT