Sadabhau Khot latest Marathi news Saam Tv
महाराष्ट्र

राष्ट्रपती राजवट लागली तरी जनतेला किंचितही वाईट वाटणार नाही : सदाभाऊ खाेत

राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी आपल समर्थन असल्याचेही सदाभाऊंनी नमूद केले.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : महाराष्ट्रात (maharashtra) राष्ट्रपती राजवट (president's rule) लागू झाली तर जनतेला किंचितही वाईट वाटणार नाही कारण दरोडेखोरांना घरातून पळवायला जी मदत लागेल ती कोणतीही मदत राज्याच्या मदतीला धावून आली तर त्याचे जनता स्वागत करेल असे मत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (sadabhau khot)यांनी येथे (sindhudurg) व्यक्त केले. (Sadabhau Khot latest Marathi news)

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण (malvan) येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरून जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा (Jagar Shetkaryancha Aakrosh Maharashtracha) या राज्यव्यापी अभियानाची सुरुवात केली. यावेळी माध्यमांशी बाेलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

सदाभाऊ म्हणाले विश्वासघाताने आलेले हे सरकार असून, सरकार मधील लोक गुंडागर्दी करत आहेत. विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे हे राज्य आम्हाला गुंडाचे व्हायला द्यायचं नाहीये. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी आपल समर्थन असल्याचेही सदाभाऊंनी नमूद केले.

दरम्यान जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा हे अभियान उद्या रत्नागिरी, एक मे राेजी काेल्हापूर, दाेन मे राेजी सांगली, सात मे राेजी सातारा, आठ मे राेजी पुणे तसेच नऊ मे राेजी नाशिक असे असेल अशी माहिती संयाेजकांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिकेसाठी दिल्लीत 'पॉवर' गेम? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

Kanda Batata Rassa Bhaji Recipe: झणझणीत कांदा बटाटा रस्सा भाजी कशी बनवायची?

तपोवन शेजारी शेकडो वृक्षांचा कत्तलेआम, वृक्ष आणि विरोधावर सरकारची कु-हाड

Zila Parishad-Corporation Election: जिल्हा परिषदेसह महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितली तारीख

Maharashtra Live News Update: हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील बर्गेवाडी मध्ये भीषण आग

SCROLL FOR NEXT