Uddhav Thackeray
Uddhav Thackeray  Saam TV
महाराष्ट्र

वाझे 'मातोश्री'वर महिन्याला 100 कोटी पाठवायचा; शिंदे गटातील खासदाराचा गंभीर आरोप, पाहा Video

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा: ५० खोके एकदम ओके म्हणताना 'शंभर खोके मातोश्री ओके' तेही दर महिन्याला जात असत, सचिन वाजे पैसे जमा करून मातोश्रीवर पाठवायचा असा गंभीर आरोप बुलढाण्याचे (Buldhana) खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांनी केला आहे.

राज्यात नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती केल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून हजर झाले होते. यावेळी शिवसेना खासदार आणि आमदार यांनी मेहकर मध्ये गुलाबराव पाटलांच शहरातून रॅली काढत जोरदार स्वागत केलं.

पाहा व्हिडीओ -

यावेळी आयोजित हिंदू गर्वगर्जना कार्यक्रमात शिंदे गटात गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट मातोश्रीवर (Motoshri) गंभीर आरोप केले आहेत. ५० खोके एकदम ओके म्हणताना 'शंभर खोके मातोश्री ओके' तेही दर महिन्याला जात असत, सचिन वाजे पैसे जमा करून मातोश्रीवर पाठवात होता. त्या प्रकरणातील अनिल देशमुख आणि वाझे हे कुठे आहेत, असं म्हणत थेट उद्धव ठाकरेवरच (Uddhav Thackeray) गंभीर स्वरूपाचा आरोप करत.

मातोश्रीला दर महिन्याला शंभर खोके जात असल्याचा खळबळजनक दावा देखील खासदार प्रतापराव जाधव यांनी करून एकच खळबळ माजवून दिली आहे. त्यामुळे या विधानानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापतय का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

आतापर्यंत शिंदे गटातील आमदारांना ५० खोके एकदम ओके, म्हणून हिणवलं जायचं, मात्र आता शिंदे गटात गेलेल्या खासदारांनी थेट मातोश्रीलाच 'शंभर खोके मातोश्री ओके' तेही दर महिन्याला म्हणत गंभीर आरोप केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Crime : तामिळनाडूहुन कल्याणला आलेली चोरट्यांची टोळी गजाआड; १२ गुन्हे उघडकीस

Today's Marathi News Live : हे अग्निवीर सरकार, त्यांना पेन्शनही नाही मिळणार; पटोलेंची केंद्र सरकारवर टीका

Sharad Pawar News | अजित पवार परतल्यास स्विकारणार? शरद पवारांचे मोठे विधान

Housing Tips: नवीन घरी शिफ्ट होताय; ठेवा 'या' गोष्टी काळजी

Vijay Wadettiwar News | कसाबमुळे करकरेंचा मृत्यू नाही? काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा दावा

SCROLL FOR NEXT