Sachin Tendulkar Devendra Fadanvis Saamtv
महाराष्ट्र

Sachin Tendulkar News: कुस्तीपटूंचे देखील स्माईल अ‍ॅम्बेसेडर व्हाल... नवी जबाबदारी स्विकारताच राष्ट्रवादीचा सचिनला टोला

Sachin Tendulkar Now Smile Ambassador: भारतरत्न सचिन तेंडूलकरला राज्य सरकारकडून नवी जबाबदारी देण्यात आली आहे.

Gangappa Pujari

Sachin Tendulkar: प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडूलकरला राज्य सरकारकडून नवी जबाबदारी देण्यात आली आहे. स्वच्छ मुख अभियानाचा राजदूत म्हणून सचिन तेंडुलकरची निवड राज्य सरकारने केली आहे. काही वेळापूर्वीच हा कार्यक्रम पार पडला.

या निवडीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने सचिन तेंडूलकरला दिल्लीमधील महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाची आठवण करुन देत कुस्तीपटूंचे देखील "स्माइल अॅम्बेसेडर" व्हाल, असे ट्विट राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केले आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुखचे स्माईल ॲम्बेसेडर असणार आहे. या निवडीनंतर सचिन तेंडूलकरवर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांचे ट्विट व्हायरल होत आहे..

काय आहे व्हायरल ट्विट...

"प्रिय सचिन तेंडुलकर, हे जाणून आनंद झाला की महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप सरकारने राज्याच्या 'स्वच्छ मुख अभियाना'साठी "स्माइल अॅम्बेसेडर" म्हणून तुमची नियुक्ती केली आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का की भाजपने त्यांचे खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या भारतीय कुस्तीपटूंच्या चेहऱ्यावरचे हास्य हिरावून घेतले आहे?"

तसेच पुढे या ट्विटमध्ये "कुस्तीपटू न्याय मागत आहेत, पण भाजप आपल्या खासदाराला वाचवण्यासाठी कुस्तीपटूंच्या न्याय्य मागण्यांकडे डोळेझाक करत आहे. तुमच्याप्रमाणेच आपल्या देशातील महिला कुस्तीपटूही देशाची शान व अभिमान आहेत. एक खेळाडू म्हणून, आपल्या क्रीडा क्षेत्रातील सहकाऱ्यांना पाठिंबा देणे तुमचे कर्तव्य आहे. आशा आहे की तुम्ही त्यांच्या प्रश्नावरही व्यक्त व्हाल आणि कुस्तीपटूंचे देखील "स्माइल अॅम्बेसेडर" व्हाल."

दरम्यान, दिल्लीतल्या जंतरमंतरवर २३ एप्रिलपासून पैलवानांचं धरणं आंदोलन सुरु आहे. खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी आंदोलकांची आहे. मात्र जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलंनाविरोधात रविवारी पोलिसांनी कडक कारवाई केली. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरहून नवीन संसद भवनाकडे कूच करणाऱ्या कुस्तीपटूंना ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची भावनेला हात घालणारी प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT