Sachin Dhas from Beed Fulfilled His Father's Dream, Got Selected in Indian Under 19 Cricket Team Saam Tv
महाराष्ट्र

Beed Inspirational News : जन्माआधीच ठरलं होतं, आमचा सचिन क्रिकेटर होणार! बीडच्या धस कुटुंबातील सचिनची धडाकेबाज स्टोरी

विनोद जिरे

Sachin Dhas from Beed Fulfilled His Father's Dream, Got Selected in Indian Under 19 Cricket Team :

आतापर्यंत आपण बीडची मागासलेला जिल्हा, ऊसतोड कामगारांचा जिल्हा, स्त्रीभ्रूण हत्यासाठी गाजलेला जिल्हा, यासह एक ना अनेक ओळख पाहिलेल्या आहेत. मात्र बीडची आता एक नवी ओळख जागतिक स्तरावर होऊ लागलीय. तसं पाहिलं तर क्रीडा क्षेत्रात अगोदरच बीडचा दबदबा आहेच.

मात्र आता पुन्हा एकदा मागासलेला जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या बीडच्या सचिन धसने ही ओळख पुसण्याचा संकल्प केलाय. आपली Under 19 या भारतीय क्रिकेट संघामध्ये निवड होण्याचा बहुमान त्याने मिळवला आहे. वडिलांनी आपल्या जन्मापूर्वीच ठरवलेलं स्वप्न सचिनने पूर्ण केलं आहे. त्याच्याच आजवरचा प्रवास कसा झालाय, हे जाणून घाऊ...   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन धस हा मूळचा बीडच्या केज तालुक्यातील सांगवी गावचा रहिवाशी आहे. मात्र त्याचं कुटुंब सध्या बीड शहरातच स्थायिक आहे. आई-वडील देखील खेळाडू आहेत. आई सुरेखा धस या बीड पोलीस दलात इन्स्पेक्टर आहेत. तर वडील संजय धस हे स्टेटलेवल पर्यत कबड्डी खेळले आहेत.

सुरुवातीला संजय धस यांना क्रिकेट आवडायचं, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली हे त्यांचे प्रेरणास्थान होते. मात्र काही कारणामुळे त्यांना क्रिकेट खेळता आलं नाही आणि त्यांनी कबड्डी खेळली. मात्र आपण जरी क्रिकेटर झालो नसलो, तरी आपल्या मुलाला क्रिकेटर बनवायचं ही त्यांनी खून गाठ बांधली होती. मुलगा जन्मापूर्वीच जेव्हा आपल्याला मुलगा होईल, तेव्हा त्याला क्रिकेटरचं बनवायचं, हे देखील ठरवलं. पहिली मुलगी समीक्षा धस झाली आणि त्यानंतर सचिन धस याचा जन्म झाला..

वयाच्या चौथ्या वर्षापासून सचिन धस याच्या प्रॅक्टिसला सुरुवात झाली. प्रॅक्टिस करत असताना एक ना अनेक अडथळे देखील आले. लहान मुलं जसे मनोरंजनासाठी खेळण्यासाठी विविध खेळणी मागतात. तसं लहानपणापासूनच सचिन धस याच्या हातात मात्र बॅट आणि बॉलच्या व्यतिरिक्त काहीच दिलं गेलं नाही आणि त्यानी देखील ते मागितलं नाही. अतिशय खडतर प्रवासातून केलेली मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आज सचिन धस याने आपल्या आई-वडिलांसह स्वतःच स्वप्न साकार केलंय. एकीकडे बीएससी ऍग्री या प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेत असताना दुसरीकडे क्रिकेटचा छंद त्यांनी जोपासला आणि त्यामध्ये त्याने करिअरचा पहिलं पाऊल टाकलंय. (Latest Marathi News)

याचबद्दल सांगताना सचिन धस याचे वडील संजय धस म्हणाले, की मला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. मात्र काही कारणामुळे मी क्रिकेटमध्ये करिअर करू शकलो नाही. तेव्हाच ठरवलं होतं की जेव्हा ही मला मुलगा होईल, तेव्हा त्याला क्रिकेटर बनवेल. त्यानंतर सचिन झाला अन त्याची वाटचाल क्रिकेटच्या दिशेने केली. त्याचं नाव सचिन ठेवण्यात देखील कारण आहे, कारण मी सचिन तेंडुलकर यांचा फॅन आहे. सुनील गावस्कर, विराट कोहली देखील मला आवडतात. त्यामुळे आज सचिनची अंडर 19 या भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. मात्र त्याने एक दिवस भारतीय क्रिकेट संघात देशाचे नेतृत्व करावा आणि चांगला परफॉर्मन्स करावा, अशी माझी अपेक्षा आहे, असं वडील संजय धस म्हणाले.

आई सुरेखा धस म्हणाल्या , की लहानपणापासूनच सचिनच्या वडिलांनी त्याला क्रिकेटर बनवायचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. मला त्याच्याकडे जास्त लक्ष देता आला नाही. त्याची सर्व जबाबदारी वडिलांनी पार पाडली, कारण मी पोलीस दरात कार्यरत असल्यामुळे मला विविध ठिकाणी ड्युटीवर जावा लागलं. आज सचिन यश संपादन केला आहे, त्याने यापेक्षाही मोठा व्हावं आणि या यशाची हवा डोक्यात जास्त जाऊ देऊ नये, पाय जमिनीवरच ठेवावे, हे माझं सांगणे असेल. आणि तो नक्कीचं मैदान गाजवेल, असा विश्वास देखील मला आहे. असं त्यांनी यावेळी म्हटलं

माझ्या भावाचं स्वप्न हे लहानपणापासूनच क्रिकेटर बनायचं होतं. वडिलांनी त्याच्या जन्मापूर्वीच त्याला क्रिकेटर बनवायचं ठरवलं होतं. आज तो अंडर 19 या भारतीय क्रिकेट संघात सलेक्ट झाला आहे. यामुळे मला अभिमान वाटतोय. आज त्याच्या नावाने आम्हाला ओळखायला लागले आहेत, असं सचिन धस याची बहीण समीक्षा धस म्हटली आहे.

तर याविषयी सचिन धस याचे कोच अजहर शेख आणि मित्र राजेश धनघाव म्हणाले की, अतिशय खडतर प्रवास करून सचिनने यश संपादन केलं आहे. अनेक वेळा ग्राउंडवर अडचणी आल्या मात्र त्यांनी माघार घेतली नाही. पहाटे चार वाजल्यापासून प्रॅक्टिससाठी तो ग्राउंडवर यायचा, आम्ही देखील असायचो. आणि आज खऱ्या अर्थानं त्यानी यश संपादन केले आहे. मात्र यापेक्षाही मोठं यश त्याने संपादन करावं, अशी आमची अपेक्षा आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्याकडे मागासलेला जिल्हा म्हणून पाहिलं जातं. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून देखील ओळख आहे. मात्र हीच ओळख आता पुसण्याचा संकल्प सचिन धस याने केलाय. छोट्याशा गावातून आणि मागासलेल्या बीड जिल्ह्यातून आलेला सचिन धस आता भारतीय क्रिकेट संघात खेळणार आहे. त्यामुळे या सचिनची बॅटिंग, बॉलिंग आणि फील्डिंग नेमकी कशी आहे? हे आता दुबई येथे होणाऱ्या क्रिकेटच्या सामन्यात दिसून येणार आहे. त्यामुळे सचिन धस याच्या वाटचालीस साम टीव्ही परिवाराच्या देखील शुभेच्छा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MVA: मविआत उमेदवारीवरुन वादंग; राऊतांकडून पाचपुतेंना उमेदवारी जाहीर होताच शरद पवार यांनी सुनावलं

Pune Crime : बदलापूरनंतर पुण्यात संतापजनक प्रकार; ४ वर्षीय चिमुकल्यावर तरुणाचा अनैसर्गिक अत्याचार

Maharashtra News Live Updates : पुण्यातील पेठ परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

Nashik Crime : पतीच्या लटकत्या मृतदेहाखाली पत्नीची दुर्गापूजा? 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Maharahstra Politics: रश्मी ठाकरे भावी मुख्यमंत्री; मातोश्रीच्या परिसराबाहेरील बॅनरमुळे चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT