Saamana Editorial Saam TV
महाराष्ट्र

Saamana Editorial: जागतिक कीर्तीची 'ब्लॅकमेलर' पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी; सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार प्रहार

Saamana On BJP: अरविंद केजरीवाल यांना देखील ई़डीकडून नोटीस आल्याअसून कारवाया सुरू आहे. इंडिया आघाडीतील बड्या पदाधिकाऱ्यांवर सुरु असलेलं ईडीचं धाडसत्र पाहून सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार प्रहार करण्यात आलाय.

Ruchika Jadhav

Political News:

राज्यात सध्या शिवसेना ठाकरे गटावर ईडीचं धाड सत्र सुरू असल्याचं दिसतंय. यासह झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील ई़डीकडून नोटीस आल्याअसून कारवाया सुरू आहेत. इंडिया आघाडीतील बड्या पदाधिकाऱ्यांवर सुरु असलेलं ईडीचं धाडसत्र पाहून सामना अग्रलेखातून आज भाजपवर जोरदार प्रहार करण्यात आलाय.

दोन मुख्यमंत्र्यांच्या अटकेचा डाव व महाराष्ट्रातील धाडीवर धाडी हे 'ब्लॅकमेलिंग'चेच सूत्र आहे. इंडिया आघाडी मजबुतीने पुढे जात असल्याचे हे चिन्ह आहे. केजरीवाल - सोरेन यांनी भाजपधार्जिणी भूमिका घेतली तर मोदीभक्त या दोघांची आरती गाऊ लागतील, अशी टीका अग्रलेखात करण्यात आलीये.

फडणवीसांना भेटायला गेले तर...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत अग्रलेखात म्हटलं आहे की,राजन साळवी, रवींद्र वायकर हे रात्री 'हुडी' वेषात फडणवीसांना भेटायला गेले तर लगेच त्यांच्या शुद्धीकरणाचे होमहवन सुरू होतील. जनतेला हे कळत नाही, असे यांना वाटते काय?, असा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

तथाकथित 'खिचडी' प्रकरणात शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांना 'ईडी' नामक भाजप संघटनेने अटक केली आहे. शिवसेनेचे कोकणातील आमदार राजन साळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने धाडी टाकल्या व गुन्हेही दाखल केले. शिवसेनेचे आणखी एक आमदार रवींद्र वायकर यांनाही ईडीचे बोलावणे आले आहे. त्यामुळे जागतिक कीर्तीची 'ब्लॅकमेलर' पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी हे आता स्पष्ट झाले आहे, अशा शब्दांत सामना अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आलंय.

मोदींच्या चेहऱ्यावर घाबरगुंडी...

एका बाजूला भाजप एकवचनी, सत्यवचनी श्रीरामाच्या पूजाअर्चेत दंग आहे. घरोघर रामाच्या नावाने अक्षता पाठवून प्रचार सुरू आहे. मोदी हे रामाचे 'पालक' असल्यासारखे फिरत आहेत. 'चारशे पार'चा नारा देत आहेत, पण त्यांच्या चेहऱ्यावर घाबरगुंडी स्पष्ट दिसत आहे, असं म्हणत अग्रलेखातून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करण्यात आलाय.

तुमचा विजय म्हणजे'ईव्हीएम'चाच घोटाळा

सामनातून पुढे ईव्हीएम घोटाळ्याचा दावा करत लिहिलं आहे की, जिंकण्याचा इतका आत्मविश्वास असेल तर हे 'ब्लॅकमेलिंग' कशासाठी? रामाला प्रचारात उतरवूनही तुम्हाला हे असले दळभद्री प्रकार करावे लागत असतील तर तुमचा विजय खरा नाही. तो 'ईव्हीएम'चाच घोटाळा आहे हे कबूल करावेच लागेल."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT