PM Modi Threat Saam tv
महाराष्ट्र

Saamana Editorial : 'बदनामीचे शिंतोडे टाळण्यासाठी सीमेवरील सत्य लपवले...'; भारत चीन तणावामुळे सामनातून PM मोदींवर हल्लाबोल

Political News: गस्ती ठिकाणे परत कशी घेणार, हे पंतप्रधान अमेरिकेतून तरी सांगतील काय?, असा सवाल मोदींना सामनातून विचारण्यात आला आहे.

Ruchika Jadhav

Mumbai News: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अशात भारत चीन सीमेवर तणावपूर्ण वातावरण पहायला मिळतंय. भारताच्या ६५ पैकी २६ गस्ती ठिकाणांवर चीनने कब्जा केला आहे. भारतासाठी ही मोठी चिंतेची बाब आहे. मात्र पंतप्रधान मोदी अमेरिकेला गेलेत. गस्ती ठिकाणे परत कशी घेणार, हे पंतप्रधान अमेरिकेतून तरी सांगतील काय?, असा सवाल मोदींना सामनातून विचारण्यात आला आहे. (Latest Marathi News)

तळपायाची आग मस्तकात गेली

"तळपायाची आग मस्तकात जावी, अशी ही बातमी असताना केंद्रीय सरकार मात्र सीमेवरील घुसखोरीबाबत लपवाछपवी करण्यात रमले आहे. जणू काही घडलेच नाही, अशा थाटात पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. सीमेवरील चीनने बळकावलेली २६ गस्ती ठिकाणे परत कशी घेणार, हे पंतप्रधान अमेरिकेतून तरी सांगतील काय?", असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

सरकारमधील मंत्र्यांना अनेक विषयांची कानोकान खबर नसते

सत्य आणि वास्तविक परिस्थिती यापासून पळ काढणे आणि सतत काही ना काही लपवत राहणे, हा विद्यमान केंद्रीय सरकारचा स्थायीभावच बनला आहे. देशातील जनतेला तर सोडाच, पण सरकारमधील सहकाऱ्यांपर्यंतही बऱ्याच गोष्टी पोहोचू दिल्या जात नाहीत. निवडक दोन डोकी वगळली तर सरकारमधील मंत्र्यांनाही अनेक विषयांची कानोकान खबर नसते. देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि संरक्षणासारख्या संवेदनशील विषयाबाबत देशाला अनभिज्ञ ठेवणे, ही देशवासीयांशी केलेली प्रतारणाच आहे. हे सगळे एवढ्या विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे चीनने लडाखमध्ये केलेली मोठी घुसखोरी आणि सरकारने त्याविषयी पाळलेली कमालीची गुप्तता!, अशा शब्दांत सामनातून भाजपवर टीका करण्यात आलीये.

कटकारस्थाने करण्यातच सरकार व्यस्त

चीन सारख्या शत्रूवर नजर ठेवण्यापेक्षा देशांतर्गत निवडणुकांची व्यूहरचना आणि सरकारच्या विरोधकांना कुठे व कसे अडकवता येईल, याची कटकारस्थाने करण्यातच सरकार चोवीस तास मश्गूल असते. वास्तविक पंतप्रधानांनी तत्काळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेणे आवश्यक होते. चिनी घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी तातडीने काय उपाययोजना करता येतील, याविषयी मंथन होणे आवश्यक होते. मात्र यापैकी काहीच घडले नाही, अशी टीका केंद्र सरकारवर सामनातून करण्यात आलीये.

बदनामीचे शिंतोडे टाळण्यासाठी सीमेवरील सत्य देशापासून लपवले

त्यातच लडाखमध्ये चिनी सैनिकांनी प्रत्यक्ष ताबा रेषेवर हिंदुस्थानच्या ६५ पैकी २६ गस्ती ठिकाणांवर कब्जा केल्याची माहिती समोर आली आहे. तळपायाची आग मस्तकात जावी, अशी ही बातमी असताना केंद्रीय सरकार मात्र सीमेवरील घुसखोरीबाबत लपवाछपवी करण्यात रमले आहे. बदनामीचे शिंतोडे टाळण्यासाठी सीमेवरील सत्य देशापासून लपवले जात आहे. जणू काही घडलेच नाही, अशा थाटात पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. सीमेवरील चीनने बळकावलेली २६ गस्ती ठिकाणे परत कशी घेणार?, असे प्रश्न विचारत सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीकास्त्र सोडलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोणत्याही प्रकारची गुंडागर्दीत नको पारदर्शक कारभार करणारी नगरपालिका हवी - देवेंद्र फडणवीस

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

SCROLL FOR NEXT