सातारा : जीएसटी आयुक्ताने कोयना धरणाच्या परिसरात एक अख्खं गाव खरेदी केल्याची बाब साम टीव्ही समोर आणल्यानंतर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी या जीएसटी आयुक्तांसह तीन जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. साम टीव्हीच्या इम्फॅक्टनंतर ही कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावलीय असून जमीन खरेदीचे कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिलेत. जर कागदपत्र घेऊन हजर झाले नाही तर ही जमीन शासन जप्ती करेल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय.
कोयना खोऱ्यातील पुर्नवसन विभागातील झाडाणी, उचाट आणि धुराणी या गावतील कमाल मर्यादेपेक्षा जास्त जमीन खरेदी केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी जीएसटी अधिकाऱ्याला नोटीस बजावण्यात आलीय. तसेच ही नोटीस बजावण्या आलेल्या तिघांना ११ जूनपर्यंत हजर राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिलेत. आयुक्तांना बजावण्यात आलेल्या नोटीससोबत त्यांना जमीन खरेदीचे कागदपत्र सादर करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार येथे रहिवाशी असलेले आणि अहमदाबाद येथे जीएसटी मुख्य आयुक्त असणारे चंद्रकात वळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी, नातेवाईकांनी अशा एकूण १३ जणांनी झाडणी, धुराणी, उचाट या गावात जमीन खरेदी केलीय. ही जमीन खरेदी कमालीपेक्षा अधिक असल्याने या व्यवहाराची चौकशी केली जात आहे. जीएसटी आयुक्तांनी बेकायदेशीर जमीन खरेदी केल्याचा आरोप सामजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला होता.
या जमीन खरेदी प्रकरणी कारवाई करण्यात यावी यासाठी मोरे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार होते. दरम्यान मोरे यांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने संबंधित व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश वाईचे प्रांताधिकारी यांना दिलेत. एका माध्यम समुहाच्या दाव्यानुसार, खरेदी केलेल्या जमिनीचे पंचनामे केले गेले असून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींचे व्यवहार झाले आहेत, त्यांचे जबाब घेण्यात आलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.