साम इम्पॅक्ट: शाळा उभारणीस मिळाले मदतीचे हात; अंथीया कंपनी बांधून देणार शाळा राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

साम इम्पॅक्ट: शाळा उभारणीस मिळाले मदतीचे हात; अंथीया कंपनी बांधून देणार शाळा

देवस्थळे जिल्हा परिषद शाळा ही नव्या जागेत एक मजली इमारत बांधली जात आहे. या इमारतीत पाच वर्ग खोल्या, स्टाफ रूम, कँटीन, स्वच्छतागृह आणि डिजिटल शिक्षण मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: रोहा तालुक्यातील चिंचवणेतर्फे आतोणे गावातील देवस्थळे जिल्हा परिषद शाळा 3 जून 2020 रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात कोलमडून गेली. शाळा पडली तरी शाळेतील मुख्याध्यापक गजानन जाधव आणि त्याच्या सहकारी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. गावातील माळरानावर झाडाच्या ऊन-सावलीत मुलांचे शिक्षण सुरू झाले. माळरानावर सुरू असलेल्या मुलांच्या शिक्षणाची बातमी साम टीव्हीने जानेवारी 2020 साली प्रसिद्ध केली.

हे देखील पहा -

मुलांची आणि शिक्षकांची शाळेविना शिक्षणासाठी चाललेली धडपड डीआरटी अंथीया केमिकल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकांनी पाहिली आणि ही शाळा कंपनीच्या सीएसआर फंडातून उभारण्याचा संकल्प केला. 7 ऑक्टोबर रोजी घटस्थापनादिनी शाळेच्या नवीन इमारत बांधकामाच्या कामाचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री अदिती तटकरे याच्या शुभहस्ते पार पडला. साम टीव्हीच्या या बातमीने आज विद्यार्थ्यांना अत्याधुनिक अशी सर्व सोयीयुक्त शाळा मिळणार आहे. अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक गजानन जाधव यांनी दिली.

साम इम्पॅक्ट: शाळा उभारणीस मिळाले मदतीचे हात; अंथीया कंपनी बांधून देणार शाळा

निसर्ग चक्रीवादळात शाळा पडल्याने गुरुजी आपली शाळा पुन्हा वर्गात कधी भरणार ? असा प्रश्न चिंचवणेतर्फे आतोणे गावातील देवस्थळे शाळेतील विद्यार्थी गुरुजींना रोज विचारत होते. मात्र या प्रश्नाचे उत्तर गुरुजीकडे नव्हते. मात्र याचे उत्तर सामच्या बातमीने गुरुजींना मिळवून दिले आहे. गजानन जाधव यांनी सोशल मीडियावर माळरानावर शाळा सुरू असल्याचे फोटो टाकले होते. माळरानावर भरत असलेल्या शाळेच्या फोटोवरून सामच्या प्रतिनिधीने जाधव यांना संपर्क करून बातमी लावली.

सामची बातमी अंथीया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पॉल मेनाचेरी यांनी पाहिली. त्यानंतर कंपनी प्रशासनाने जाधव याच्याशी संपर्क करून आम्ही सीएसआर फंडातून शाळा बांधून देतो असे आश्वासन दिले. मात्र कोरोना आणि पावसाळा यामुळे काही महिने हा विषय प्रलंबित राहिला. अखेर पुन्हा शाळेचा विषय कंपनीने घेऊन अखेर शाळा इमारत बांधकामास नवरात्रीचा मुहूर्त पकडून काम सुरू झाले.

देवस्थळे जिल्हा परिषद शाळा ही नव्या जागेत एक मजली इमारत बांधली जात आहे. या इमारतीत पाच वर्ग खोल्या, स्टाफ रूम, कँटीन, स्वच्छतागृह त्याचबरोबर डिजिटल स्वरूपात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे. 10 लाख सीएसआर निधी या इमारतीसाठी कंपनीने दिला आहे. देवस्थळे शाळेत 66 आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे निसर्गात पडलेली आपली शाळा पुन्हा नव्याने उभी राहणार असल्याने या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद पसरला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT