रशिया-युक्रेन युद्धात मुलांचं शिक्षणाची लागली वाट; पैसे अन् वर्ष गेले वाया! SaamTvNews
महाराष्ट्र

रशिया-युक्रेन युद्धात मुलांचं शिक्षणाची लागली वाट; पैसे अन् वर्ष गेले वाया!

राज्य आणि केंद्र सरकारने मुलांच्या शिक्षणाची सोय करावी : आमदार अभिमन्यू पवार

दीपक क्षीरसागर

लातूर : जगात वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन प्रसिद्ध असल्याने जगभरातील पालकांची पसंती ही युक्रेनला असते. पण, रशिया युक्रेन युद्धामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण आणि परिक्षेविना परतावं लागत आहे. आता या विद्यार्थ्यांच वर्ष आणि पालकांचा पैसा वाया गेला या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी राज्य शासन काय करणार असा सवाल आता पालक उपस्थित करत आहेत. तर या बाबतीत राज्य आणि केंद्र सरकारने विशेष बाब म्हणून या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करावी अशी मागणी औसा येथील भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे.

हे देखील पहा :

बारावी परीक्षा झाल्यानंतर लातुरातून 28 विद्यार्थी युक्रेनला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेले. यासाठी अनेक पालकांनी चार चार पाच पाच लाखांचा वार्षिक खर्च केला. काहींनी बँकांचे कर्ज काढले. मुलं शिकली तर डॉक्टर होऊन त्याचं आयुष्य सुखाच होईल पण या युद्धामुळे आता विद्यार्थ्यांना मायदेशी परतावं लागत आहे. युद्ध कधी संपेल? कोण जिंकेल? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. तरी पण या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच काय? मुलं परत आलीत त्यांच्या शिक्षणासाठी राज्य सरकार काही करणार आहे का? की आमच्या मुलांचं भविष्य अंधारात राहणार आहे असा सवाल आता पालक विचारत आहेत.

यावर राज्य आणि केंद्र सरकारने विशेष बाब म्हणून या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण द्यावे युक्रेनमध्ये रॅकेट हल्ल्यात अनेक महाविद्यालय बेचिराख होत आहेत. त्यांची कागदपत्रे किती सुरक्षित राहतील हाही मोठा प्रश्न आहे. पालकांचे पैसे गेले, विद्यार्थ्यांची कागदपत्रे अडकली. तर या विद्यार्थ्यांना परिक्षेविना परतावं लागलं आणि यात वर्षही वाया जात आहे. एकंदरीत परिस्थिती निवळण्यासाठी किती काळ लागेल हे माहित नाही. या विद्यार्थ्यांचे भविष्यात अंधारात असल्याने यावर शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mission Moolvaat : रोजगारासाठीचं स्थलांतर थांबवण्यासाठी 'मूळवाट' मिशन सुरु, जाणून घ्या सविस्तर

Mount Everest: माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा, १००० गिर्यारोहक अडकले; सतर्कतेचा इशारा जारी

Dharashiv : अतिवृष्टीमुळे नुकसान, कर्जफेडीची विवंचना; तरुण शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

Maharashtra Live News Update : थोड्याच वेळात नगरपालिका, नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत जाहीर होणार

Paytm Users साठी फेस्टिव्ह ऑफर, प्रत्येक पेमेंटवर मिळणार Gold Coin अन् डिजिटल फायदे

SCROLL FOR NEXT