पलावा जंक्शन परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी

अनधिकृत बांधकामांचे वाढते प्रस्थ आणि त्यावरील कारवाई यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन पहिल्यापासूनच चर्चेत राहिले आहे.
पलावा जंक्शन परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी
पलावा जंक्शन परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणीSaamTvNews
Published On

डोंबिवली : अनधिकृत बांधकामांचे वाढते प्रस्थ आणि त्यावरील कारवाई यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन पहिल्यापासूनच चर्चेत राहिले आहे. पलावा जंक्शन परिसरात देखील अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात आहेत. याठिकाणी पलावा पुलाचे काम सुरू असून या बांधकामांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. तसेच पुलाच्या लगतच ही बांधकामे असल्याने एखादा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

हे देखील पहा :

कल्याण शीळ रोडवरील पलावा जंक्शन परिसरात पुलाचे काम सुरु आहे. याला लागूनच अनधिकृत बांधकाम हॉटेल्स, वाईन शॉप व  इतर छोटी मोठी दुकाने सुरू आहेत. विकास आराखड्यात बाधित होणारी हि बांधकामे काटई पुलाच्या कामात देखील आडकाठी आणत आहे. तब्बल ७ ते ८  वर्षे हि अनधिकृत बांधकामे या भागात उभी आहेत. २०१६ साली हि अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने इ प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले होते.

पलावा जंक्शन परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी
प्राजक्त तनपुरे यांचाच करेक्ट कार्यक्रम झाला : सुजय विखे

मात्र अद्याप त्यावर पालिकेने कारवाई केली नाही. या अनधिकृत बांधकामांना कोणाचे अभय मिळत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान हे अनधिकृत बांधकाम आणि गाळे तोडले तर पलावा जंक्शन येथे ट्रॅफिक होणार नाही, असे स्थानिकांचे मत आहे. प्रामुख्याने आरक्षित भूखंड, रस्त्यामध्ये बाधित असलेली बांधकामे किंवा नव्याने होत असलेली बांधकामे यांच्यावर कारवाईला सर्वात आधी प्राधान्य दिले जाणार असल्याचे केडीएमसीने सांगितले आहे. मात्र, कल्याण डोंबिवलीमध्ये असं होताना दिसून येत नाही.

पलावा जंक्शन परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी
कांदा चिरताना आईच्या डोळ्यातील अश्रू पाहून सातवीच्या विद्यार्थ्याने बनविला स्मार्ट चाकू!

पलावा जंक्शन परिसरात अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली असून त्यामध्ये दारूची दुकाने आहेत. या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असून तिथे पुलाचे काम देखील सुरु आहे. त्यामुळे तिथे एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? विकास आराखड्याचे नियम पाळले गेले नाहीत. याबाबत पालिकेत हजार वेळा मेसेज केले तरी सुद्धा कारवाई होत नाही. त्यांच्यावर एका खासदाराचा दबाव येतोय, असे अधिकारी स्पष्टपणे बोलत असल्याची माहिती आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com