अहमदनगर : राज्यात सध्या आरोप-प्रत्यारोपाना चांगलाच ऊत आलेला असून महाविकास आघाडी सरकारकडून केंद्रातील भाजप सरकारवर रोज निशाणा साधला जात आहे. तर केंद्र सरकार ईडीचा (ED) वापर करत महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या पाठी चौकशीचा भुंगा लावून देत असल्याची देखील टीका होत आहे. या प्रकरणावर भाष्य करताना नगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे (Sujay Vikhe-Patil) यांनी कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे मंत्री ठरवू शकत नाही तर जनताच त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल; असा इशारा देत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
हे देखील पहा :
नबाब मलिक (Nawab Malik) यांनी देखील त्यांचे आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा दिला पाहिजे असेही विखे पाटील म्हणाले. महाविकास आघाडी टिकेल अथवा नाही यावर भाष्य करण्यासाठी मी फार लहान माणूस आहे. मात्र एखादा मंत्री ज्याच्यावर देशद्रोहाचे व देशद्रोह्यांबरोबर राहिल्याचे आरोप झाले आहेत. जोपर्यंत त्यांचे आरोप निर्दोष सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी राजीनामा दिला होता. त्यांची चौकशी सुरू आहे. देशद्रोहाचे आरोप असूनही पक्ष राजीनामा घेत नाही हीच महाविकास आघाडीचे सत्य आहे. सत्तेसाठी काहीही झाले तरी आम्ही मंत्रीपद जाऊ देणार नाही, या विश्वासाने महाविकास आघाडीचे मंत्री काम करत आहेत.
नवाब मलिक यांच्या चौकशीच्या विरोधात महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारमधील पक्षांनी नगर येथे एक आंदोलन केले होते. त्यावेळी बोलताना प्राजक्त तनपुरे यांनी ‘आम्ही ठरवले तर भाजपच्या जिल्ह्यातील माजी आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करू' असा इशारा दिला होता. त्यांच्या या वक्तव्याला सुजय विखे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) हे करेक्ट कार्यक्रम कशा बद्दल म्हणाले, त्यामागे त्यांची भावना काय होती? हे मी सांगू शकत नाही. कदाचित त्यांची भावना वेगळी असेल. लोकशाहीत मतदार हाच परमेश्वर असतो. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने भाष्य करत असाल, कार्यक्रम लावू म्हणत असाल तर कोणाचा कार्यक्रम लावायला गेले आणि कोणाचा कार्यक्रम होऊन बसला हे आता लोकांच्या लक्षात आले आहे, असे सुजय विखे यांनी म्हटले आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.