Rural Students Issue  Saam Tv
महाराष्ट्र

Rural Students Academic Progress: ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ढासाळतेय, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दुसरीचं पुस्तक वाचता येईना, ASER चा अहवाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rural Students Progress Report

देशात अजूनही ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक प्रगतीसाठी संघर्ष करताना दिसत आहेत. दहावी आणि बारावीतील विद्यार्थी दुसरीचे पुस्तक देखील वाचू शकत नाही, हे 2023 च्या अहवालात समोर आलंय. 14 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये मुलभूत वाचन आणि अंकगणिताच्या समस्या जाणवल्या (Rural Kids Progress) आहेत. या वयोगटातील 25 टक्के विद्यार्थी त्यांच्या प्रादेशिक किंवा मातृभाषेतील इयत्ता दुसरीचं पुस्तक देखील अस्खलितपणे वाचू शकत नाहीत. तर जवळपास 47 टक्के विद्यार्थी इंग्रजीतील वाक्ये वाचू शकत नाहीत, असं शिक्षणाच्या नवीनतम वार्षिक स्थितीचा सर्वेक्षण अहवालात ( ASER) स्पष्ट झालंय. (Latest News)

ग्रामीण भारतातील 14 ते 18 वर्षे वयोगटातील निम्म्याहून अधिक मुले (Rural Students) तीन अंकी भागाकाराचे उदाहरण देखील सोडवू शकत नाही. या प्रकारची गणितं इयत्ता तिसरी आणि चौथीमध्ये शिकवले जातात. वेळ ठरवणे आणि मूलभूत गणना करणे, यासह त्यांना अनेक समस्या आहेत, असं अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्टमध्ये सांगितलं गेलंय. (ASER) ची आवृत्ती बुधवारी प्रसिद्ध झाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गणित विद्यार्थ्यांसाठी मोठं आव्हान

मूलभूत गणित हे विद्यार्थ्यांसाठी मोठं आव्हान असल्याचं समोर आलंय. सर्वेक्षण केलेल्या विद्यार्थ्यांपैकी अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांना साधा भागाकार करता आला नाही. ASER 2023 ने सर्वेक्षण केलेल्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत अंकगणित आणि वाचन कौशल्ये, दैनंदिन गणना, वाचन, लिखित सूचना समजून घेणे आणि आर्थिक गणिते लागू करण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन (Rural Kids Progress) केले.

मुलं शाळेपासुन दुरावली

यामध्ये, मुलांनी मुलींपेक्षा चांगली कामगिरी केल्याचं समोर आलंय. 14-18 वयोगटातील 45% मुले कमीत कमी भागाकार करू शकतात तर फक्त 41.8% मुली हे गणितं सोडवू शकतात. 50.5% मुलांनी वेळेची गणना आधारित गणितं केली, तर फक्त 41.1% मुली हे गणितं सोडवू शकल्या आहेत. यासोबतच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. 14 ते 18 वर्षे वयोगटातील 86.8 टक्के मुलांनीच शैक्षणिक संस्थेत नाव नोंदणी केली (Rural Students Academic Progress) आहे. कोरोना महामारीमुळं मुलं शाळेपासुन दुरावल्याचं दिसतंय. ही एक चिंताजनक बाब आहे.

सोशल मीडियाचा वापर

सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, या वयोगटातील निम्म्याहून अधिक (55.7%) तरुणांनी कला शाखेत प्रवेश घेतला होता, तर बाकीच्यांनी इतर शाखेत प्रवेश घेतला आहे. यामध्ये स्त्रियांपेक्षा (28.1%) पुरुषांचं (36.3%) प्रमाण अधिक आहे. सर्वेक्षण केलेल्यांपैकी सुमारे 89% लोकांच्या घरात स्मार्टफोन होता. या वयोगटातील 90.5% मुलांनी सांगितले की, त्यांनी पूर्ण आठवड्यात सोशल मीडियाचा वापर केला होता. यातही पुरुषांचे प्रमाण (93.4%) स्त्रियांपेक्षा (87.8%) थोडं जास्त आहे.

26 राज्यांमध्ये सर्वेक्षण

ASER सर्वेक्षण 26 राज्यांमधील 28 जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये 14-18 वयोगटातील 34,745 मुलांचा समावेश होता. प्रत्येक राज्यात एका ग्रामीण जिल्ह्याचे सर्वेक्षण करण्यात आलंय. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी दोन ग्रामीण जिल्ह्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: 'डरपोक शिंदे सरकार, निवडणुका घेण्याची हिम्मत नाही', संजय राऊतांनी तोफ डागली; 'वन नेशन, वन इलेक्शन'वरुनही टीका

Maval News : शरद पवारांच्या पक्षाला भाजपचा पाठिंबा? अजितदादांच्या आमदाराचा गंभीर आरोप

Maharashtra News Live Updates : धनगर आंदोलनाचे पडसाद, पुणे- इंदापूर महामार्ग रोखला

Train Cancelled: पुण्यातून धावणाऱ्या तब्बल १० रेल्वेगाड्या रद्द; अनेकांचे मार्ग बदलले; कारण काय?

Mahalakshmi Yog: ३ दिवसांनी बनणार पॉवरफुल महालक्ष्मी योग; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार

SCROLL FOR NEXT