Sangli Accident News saam tv
महाराष्ट्र

Sangli Accident News : धावत्या जीपमधून ताेल गेला, बसर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका ठार

Bilur-Basargi Road Accident News : पाेलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

विजय पाटील

Sangli News : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात बसर्गी ते बिळूर मार्गे एका चारचाकी गाडी चालकाने अचानक ब्रेक लावल्याने एका परिचारिकेचा डांबरी रस्त्यावर डोके आपटून जागीच मृत्यू झाला. रूपाली तानाजी जाधव- सुर्वे (rupali tanaji jadhav- surve) (वय 35) असे मृत परिचारिकेचे नाव आहे. (Maharashtra News)

रूपाली जाधव या बसर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून काम करत होत्या. त्या एका चारचाकीतून कामावरून जतकडे येत असताना बसर्गी जवळ चालकाने अचानक ब्रेक लावल्याने त्यांचा तोल गेला. त्या रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.

या घटनेनंतर गाडी चालकाने रुपाली यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जत येथे खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्या मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान साेमवारी सायंकाळी या घटनेची जत पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या धारूर तालुक्यातील हिंगणी येथील सरस्वती नदीला पूर

ओमराजे निंबाळकरांनी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी का केली? धाराशीवमधील सभेत उद्धव ठाकरेंनी थेट पडद्यामागची गोष्टच सांगितली

Chanakya Niti: या 8 गोष्टी चुकूनही कोणालाही सांगू नका, अन्यथा होईल तुमचंच मोठे नुकसान

'तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Eiffel Tower Lightning: आयफेल टॉवरवर वीज कोसळली, थरारक VIDEO होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT