Rumors the police will arrest Manoj Jarange Patil, Maratha youth rush to Antarwali Sarati in Jalna Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना पोलीस उचलणार असल्याची अफवा; हजारो तरुणांची अंतरवाली सराटीत धाव, परिसरात शांतता

Manoj Jarange News: मनोज जरांगे पाटील यांना पोलीस उचलणार असल्याची अफवा मंगळवारी रात्री पसरली. त्यानंतर हजारो तरुणांनी अंतरवाली सराटी गावात धाव घेतली.

Satish Daud

Manoj Jarange Patil Latest News

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस असून जरांगे यांनी राज्य सरकारला शेवटच्या अल्टिमेटम दिला आहे. आज म्हणजेच बुधवारी सायंकाळपर्यंत मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्या, अन्यथा पाण्याचाही त्याग करणार असं जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना पोलीस उचलणार असल्याची अफवा मंगळवारी रात्री पसरली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानंतर मराठवाड्यातील हजारो तरुण जालन्यातील अंतरावाली सराटी गावात (Jalna News) दाखल झाले. यावेळी मराठा तरुणांनी जरांगे यांची विचारपूस करत परिस्थितीचा आढावा घेतला. मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास अंतरवाली सराटी गावात ठिकठिकाणी मराठा तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे दिसून येत होते.

परंतु, गावात शांतता होती. मंगळवारी सायंकाळी जालन्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्यानंतर ही अफवा पसरली होती. दरम्यान, अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन पोलिसांकडून (Police) करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे.

मराठा आरक्षणाची मागणी पूर्णपणे मान्य होत नसल्याने काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. असे असले तरी मनोज जरांगे पाटील हे शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन समाजाला करीत आहेत. अशातच आमरण उपोषणाच्या सातव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मोबाईल इंटरनेट सेवा ठप्प झाली.

त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना आता पोलीस उचलणार अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली. तर काहींनी या गोष्टीची अफवा देखील पसरवली. ही अफवा कानावर पडताच मिळेल त्या वाहनाने हजारो मराठा तरुणांनी अंतरवाली सराटी गावात धाव घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT