satara, ruchesh jayvanshi, Khirkhindi
satara, ruchesh jayvanshi, Khirkhindi saam tv
महाराष्ट्र

Saam Impact : कोयना जलाशयातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास थांबणार; जिल्हाधिकारी, ग्रामस्थ बैठकीस यश

ओंकार कदम

सातारा : खिरखंडी (khirkhandi) येथील व्याघ्र प्रकल्प पुनर्वसनाचा प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावला जाईल असा विश्वास जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी (ruchesh jayvanshi) यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केला. साताऱ्यातील (Satara) खिरखंडी येथील विद्यार्थ्यांचा (students) शिक्षणासाठी होणारा खडतर प्रवासाची साम टिव्हीने बातमी दाखवली त्यानंतर तेथे मदत पाेहचली. आता जिल्हाधिकारी जयवंशी रुजू झाल्यानंतर त्यांनी खिरंखंडीस (khirkhandi News) ठिकाणी भेट देऊन ग्रामस्थांची भेट घेतली. त्यानंतर साम टीव्हीशी बाेलताना त्यांनी मुलांच्या शिक्षणाचा (education) प्रश्न मार्गी लागला आहे. ग्रामस्थांनी मुलांना वसतीगृहात ठेवण्यास मान्यता दिल्याचे सांगितलं. (Ruchesh Jayvanshi Latest Marathi News)

जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले खिरखंडी येथील ग्रामस्थांशी मी स्वत: चर्चा केली. पुनर्वसन मान्य नसल्याने या गावातील सहा खातेदार हे अद्यापही मूळ खिरखंडी या गावात वास्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय बिकट बनला होता.

ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतल्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या जीवाचा प्रश्न असल्याने मुलांना वसतिगृहात ठेवण्याची विनंती केली. या निर्णयास ग्रामस्थांनी मान्यता दिली आहे. तसेच या कुटुंबाचे लवकरच पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल असेही जिल्हाधिकारी जयवंशी यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : छत्रपती श्रीमंत शाहू महाराजांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, समाजवादी पक्षाचं आवाहन

Viral Video: वह्या, पुस्तक, बँच बाय बाय; गरम होत असल्याने शाळेने वर्गात विद्यार्थ्यांसाठी बनवला स्विमिंग पूल

Fire News: भीषण अग्नितांडव; राज्यात तीन ठिकाणी आगीच्या घटना, नाशिकमध्ये स्फोटात तिघे होरपळले

MI Playoffs Scenario: मुंबईला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! फक्त करावं लागेग हे काम; वाचा समीकरण

Mumbai Goa Highway Traffic Jam : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT