Sunetra Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचं संघ दक्ष, RSS च्या बैठकीला सुनेत्रा पवारांची हजेरी? कंगनाच्या घरी काय घडलं?

Kangana Ranaut: अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार RSS च्या कार्यक्रमात हजेरी लावल्याचा फोटो समोर आला होता. कंगणा रनौतच्या घरी राष्ट्र सेविका समितीचं आयोजन केलं होतं. या फोटोवरून राजकारण तापले आहे.

Priya More

भरत मोहळकर, साम टीव्ही

कंगना रनौतच्या घरी भेट दिलेल्या सुनेत्रा पवारांच्या फोटोवरुन वाद उफाळून आलाय. मात्र हा वाद नेमका काय आहे? आणि त्यावर सुनेत्रा पवारांनी काय स्पष्टीकरण दिलंय? पाहूयात...

हा फोटो नीट पाहा. अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार RSS च्या कार्यक्रमात हजर असल्याचं दिसतंय. कंगणा रनौतच्या घरी राष्ट्र सेविका समितीचं आयोजन केलं होतं.या कार्यक्रमात सुनेत्रा पवारांची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे.तर याच फोटोवरुन आमदार रोहित पवारांनी थेट अजित पवारांना टार्गेट केलंय.

मात्र सुनेत्रा पवारांच्या कार्यक्रमांची आपल्याला माहिती नसते, असं म्हणत अजित पवारांनी चर्चांना पुर्णविराम दिलाय. अखेर या सगळ्या वादानंतर सुनेत्रा पवारांनी या कार्यक्रमाविषयी स्पष्टीकरण दिलंय. एका कार्यक्रमात उपस्थितीवरुन चर्चा सुरु आहे. मात्र त्यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता. इतर महिला खासदारांसह राज्यसभेची सदस्य म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते. देशभरातील महिलांच्या सामाजिक कामाची ओळख करुन घेण्यासाठी कंगणाच्या घरी कार्यक्रमाला गेले. मात्र मला RSS च्या कार्यक्रमाची माहिती नव्हती, असा दावा सुनेत्रा पवारांनी केलाय.

खरंतर महायुतीत सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी शिव-शाहू-फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा दाखला दिलाय.. एवढंच नव्हे तर RSS च्या मुख्यालयात जाणंही अजित पवारांनी टाळलंय.

31 ऑगस्ट 2024 ला शिंदे, फडणवीसांनी RSS च्या स्मृती मंदिराला भेट दिली. या कार्यक्रमाला न जाता अजित पवारांनी दीक्षाभुमी गाठली. एवढंच नाही तर RSS ने हिवाळी अधिवेशनादरम्यान महायुतीच्या आमदारांसाठी कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. त्यालाही अजित पवार गैरहजर राहिले.

सुनेत्रा पवार दिल्लीतील RSS च्या कार्यक्रमाला हजर राहिल्याच्या वादाचं दूध पोळल्याने अजित पवारांची राष्ट्रवादीचे नेते कुठल्याही कार्यक्रमाला हजर राहताना ताकही फुंकून पिणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

नाशिक, अमरावतीनंतर यवतमाळमध्येही लव्ह जिहाद? 'यवतमाळमध्ये 34 अल्पवयीन मुली बेपत्ता'

SCROLL FOR NEXT