देशात यंदा दसऱ्याला सगळ्यांचे लक्ष हे महाराष्ट्राकडे लागून राहिलंय. कारण संघाचा दसरा मेळावा यंदा विशेष आहे. या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीत आपली हयात घालवलेल्या आणि कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीला टोकाचा विरोध करणाऱ्या दिवंगत नेत्यांची पत्नी सहभागी होणारेय. होय. आरएसएसनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे संस्थापक दिवंगत रा.सु.गवई यांच्या पत्नी आणि भारताचे सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आईंना विजयादशमीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून बोलवलंय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुवादाची होळी करत संघाच्या कडव्या हिंदुत्त्ववादाला विरोध केला मात्र आता त्याच संघानं आंबेडकरी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या कमला गवईंना आपल्या कार्यक्रमात बोलावल्यानं आरआरएसच्या सोशल इंजिनिअरिंगची चर्चा रंगलीये. संघानं विचारधारा कायम ठेवत विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी सर्वसमावेश धोरण राबवल्याचं याआधी प्रणव मुखर्जींना आपल्या कार्यक्रमात आंमंत्रित करून दाखवून दिलं होतं मात्र आता थेट सरन्यायाधीशांच्या मातोश्रींना बोलावून संघानं आपल्या विषयीची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केलाय का... मात्र या निमंत्रणावर गवईंनी स्पष्ट माहिती दिलेली नाही. कारण आता समाज माध्यमांवर एक वायरल झालेलं हे पत्र पाहा.
आर एस एसच्या कार्यक्रमात सहभागी होणार हे धादांत खोट आहे. या कार्यक्रमात मी सहभागी होणार नाही. मी सहभागी होणार हे आरएसएसचं षडयंत्र आहे. मी हे निमंत्रण स्विकारत नाही.
हे पत्र कमलताई गवई या कार्यक्रमात सहभागी होणार नाही असा दावा करणार आहे. हे पत्र अधिकृत आहे की नाही याबाबत कुठलीच स्पष्टता नाही. त्यामुळे या कार्यक्रमाला कमलताई गवई उपस्थित राहणार की नाही याबाबतचा संभ्रम कायम आहे..संघाचं हे शताब्दी वर्ष आहे.. संघ बदलतोय. आणि बदललेल्या संघाच्या विचारानं आता वैचारिक आदानप्रदान वाढवलंय. म्हणून आता संघाच्या दसरा मेळाव्यात समतेचा विचार मांडला जातो का हे पाहणं देखिल महत्वाचं असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.