Minister Caught Playing Rummy in Assembly Saam Tv News
महाराष्ट्र

Politics: रोहित पवारांकडून कृषीमंत्र्यांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल; 'जंगली रमी पे आओ ना महाराज' म्हणत लगावला टोला

Minister Caught Playing Rummy in Assembly: रोहित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात रमी खेळत असल्याचा व्हिडिओ शेअर करत टीका केली. राज्यात दररोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना, मंत्री मात्र खेळात व्यस्त.

Bhagyashree Kamble

अलिकडेच 'दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र यायची वेळ आल्यास आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सल्ला घेऊ' असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकतेच केले होते. यावर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

रोहित पवार यांनी सोशल मीडिया (एक्स)वर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओ कोकाटे सभागृहात दिसत असून, ते रमी खेळत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनही दिला आहे.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'जंगली रमी पे आओ ना महाराज.. खरंतर सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपाला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात दररोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना देखील, सभागृहात काहीच काम नसल्यामुळे कृषीमंत्री कोकाटे यांच्यावर रमी खेळण्याची वेळी येत असावी' असा खोचक टोला त्यांनी पोस्ट शेअर करत दिला आहे.

'कभी गरीब किसानो की खेती पर भी आओ ना महाराज'

'कभी गरीब किसानो की खेती पर भी आओ ना महाराज' ! रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा, कर्जमाफी, भावांतराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्त आवाज ऐकू येईल का?, असा सवाल रोहित पवारांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, 'कधीतरी शेतीवर या महाराज! खेळ थांबवा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या..' असंही रोहित पवार म्हणाले आहेत. दरम्यान, व्हायरल व्हिडिओवर कोकाटे काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर महानगर पालिकेची अंतिम प्रभाग रचना अद्याप जाहीर नाही

राजकारणात खळबळ! एकनाथ शिंदेंच्या पुण्यातील बड्या नेत्याला ५० कोटींची नोटीस, नेमकं कारण काय?

पॉलिथीनमध्ये सापडला शिर नसलेला मृतदेह; ४ पिशवीत शरिराचे तुकडे, टॅटूवरून ओळख पटली, अभिनेत्रीच्या शिराचा शोध अजूनही लागेना

Dombivli News: एक दिवाळी अशी ही...! गतिमंद विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम; विक्रीसाठी बनवलं कंदील, ग्रीटिंग कार्ड आणि बरंच काही

PCOD: पीसीओडी असल्यास करा 'हे' सोपे उपाय, काही दिवसातच दिसेल फरक

SCROLL FOR NEXT