Rohit Pawar on Raj Thackeray saam tv
महाराष्ट्र

Rohit Pawar on Raj Thackeray: 'राज ठाकरेंची भाषण करण्याची स्टाईल आता पूर्वीसारखी राहिली नाही'

Rohit Pawar News: शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांच वागणं पाहून पुन्हा मागे घेतला असावा असे राज ठाकरे म्हणाले होते.

Chandrakant Jagtap

>>भरत नागाने

Rohit Pawar on Raj Thackeray Speech: राज ठाकरे यांची भाषण करण्याची स्टाईल आता पूर्वीसारखी राहिली नाही असा खोचक टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे. शनिवारी रत्नागिरीतील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी अजित पवारांची मिमिक्री केली होती. तसेच शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांच वागणं पाहून पुन्हा मागे घेतला असावा असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर बोलताना रोहित पवारांनी ही टीका केली आहे.

रोहित पवार म्हणाले, राज ठाकरे हे पूर्वी ज्या स्टाइलने भाषण करायचे, त्यांची जी बॉडी लँग्वेजअसायची आणि तेव्हा ते जे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडताना त्यांची जी स्टाइल असायची ती स्टाइल आणि बॉडी लँग्वेज आता राहिलेली नाही. त्यांनी अर्ध भाषण पूर्वीच्या स्टाइलने केलं आणि अर्ध भाषण कुठल्या तरी पक्षाच्या प्रभावाखाली होतं की काय असा प्रश्न अनेकांना पडत असतो. त्यामुळे दुसऱ्यांच्या बॉडी लॅग्वेजपेक्षा त्यांचीच बॉडी लँग्वेज बदलली. हे माझ्यासारख्या त्यांच्या भाषणाचा फॅन असलेल्या कार्यर्त्याला खूप योग्य वाटते असं नाही, असे रोहित पवार म्हणाले.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

राज ठाकरे यांची शनिवारी रत्नागिरीमध्ये जाहीर सभा सपन्न झाली. यावेळी राज ठाकरेंनी भाषणाच्या (Raj Thackerays speech) सुरुवातीलाच शरद पवारांच्या राजीनाम्यावरून अजित पवारांना टोला लगावला. राज ठाकरे म्हणाले, मला वाटतं त्यांनी खरच राजीनामा दिला होता, पण अजित पवारांचं वागणं पाहून त्यांनी मागे घेतला असावा. हे आत्ताच असे वागताहेत, तर पुढे कसे वागतील असे त्यांना वाटले असावे, असा टोला त्यांनी अजित पवाराना लगावला.

राज ठाकरेंनी केली अजित पवारांची मिमिक्री

पुढे बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, जवळपास आतून उकळ्या फुटत होत्या, जे होतंय ते चांगलं होतंय असं वाटतं त्यांना वाटत होतं. पवारांसमोरच ते कार्यकर्त्यांना ए.. तू गप्प, ए... तू शांत बस, ए... तो माईक हातातन घे... असे म्हणाले. हे सर्व पवार साहेबांनी पाहिल्यानतंर त्यांना वाटलं असेल की मी आत्ताच राजीनामा दिला तर यांचं कार्यकर्त्यांसोबत वागणं असं आहे, उद्या मलाही म्हणेल, ए तू गप्प बस असेही राज ठाकरे म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

Maharashtra Rain Live News: खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग; पुण्यातील टिळक पूल वाहतुकीसाठी बंद

Parliament: अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल, लोकसभेत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT