Wriddhiman Saha: रिद्धिमान साहाचा रौद्र अवतार! 20 चेंडूत ठोकलं अर्धशतक, 81 धावांची तूफानी खेळी

Wriddhiman Saha Half Century: साहाने त्याच्या खेळीत 43 चेंडूंचा सामना करत 81 धावा कुटल्या. त्याच्या या धमाकेदार खेळीत 4 षटकार आणि 10 चौकरांचा समावेश होता.
Wriddhiman Saha Fastest Half-century
Wriddhiman Saha Fastest Half-centurysaam tv

Wriddhiman Saha IPL 2023: लखनऊ विरुद्ध सामन्यात गुजरातच्या रिद्धिमान साहाचा रौद्र अवतार पाहायला मिळाला. गुजरातकडून सलामीसाठी उतरलेल्या साहाने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक (Wriddhiman Saha Fastest Half-century) ठोकून गुजरातला दमदार सुरुवात करून दिली. साहाने त्याच्या खेळीत 43 चेंडूंचा सामना करत 81 धावा कुटल्या. त्याच्या या धमाकेदार खेळीत 4 षटकार आणि 10 चौकरांचा समावेश होता.

गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2023 चा (IPL 2023) 51 वा सामना गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायन्ट्स (GT vs LSG) या दोन संघात सुरू आहे. या सामन्यात लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी उतरलेल्या गुजरातच्या संघाने अवघ्या 12 षटकात नाबाद 142 धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर शुभमन गिल आणि रिद्धिमान यांच्यात 142 धावांची भागीदारी झाली.

Wriddhiman Saha Fastest Half-century
Rohit Sharma On Loss: दारुण पराभवानंतर हिटमॅन भडकला! 'या' खेळाडूला कारणीभूत ठरवत सांगितलं पराभवाचं कारण

पॉवर प्लेमध्ये 241 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी

रिद्धिमान साहाने पहिल्याच षटकात 2 चौकारांसह सुरुवात केली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. पॉवर प्लेमध्ये साहाने 241 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने अवघ्या 20 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या अनुभवी फलंदाजाने षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक ठोकेपर्यंत साहाने 6 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार ठोकले होते. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे गुजरातने पॉवर प्लेमध्ये 78 धावांचा आकडा गाठला. (IPL 2023)

के एल राहुलच्या जागी होऊ शकते निवड

लखनऊविरुद्धच्या सामन्यापूर्वी साहाने या मोसमात सर्वाधिक 47 धावा केल्या होत्या. त्याने 10 सामन्यांत केवळ 192 धावा केल्या. पण 11व्या सामन्यात त्याने लखनऊच्या गोलंदाजांना धू धू धूततले. त्याने हा फॉर्म आणखी पुढेही कायम ठेवला तर केएल राहुलच्या जागी त्याची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी निवड होऊ शकते. (Latest Sports News)

Wriddhiman Saha Fastest Half-century
IPL 2023 Rcb vs DC: रनमशिन कोहलीचा 'विराट' विक्रम! अशी कामगिरी करणारा IPL च्या इतिहासातील पहिलाच फलंदाज

दोन्हीं संघाचे कर्णधार पांड्या बंधूच

आयपीएल (IPL 2023) च्या 51 व्या सामन्यात भावांमध्ये स्पर्धा आहे. लखनऊचा कर्णधार कृणाल पंड्या त्याचा धाकटा भाऊ हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली गुजरातला स्पर्धा देत आहे. या सामन्यात मोठा भाऊ कृणालने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण गुजरातच्या वतीने सलामीवीर वृद्धिमान साहाने येताच हा निर्णय चुकीचा ठरवला. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com