rohit pawar criticizes central and maharashtra government on eve of ram mandir inaguration saam tv
महाराष्ट्र

Ram Mandir Nirman: रामाला अभिप्रेत असलेलं रामराज्य कुठे आहे? राेहित पवार

भारत नागणे

Pandharpur News :

आज देशभर रामलल्ला प्रतिष्ठापनेच्या (ayodhya ram temple pran pratishtha) निमित्ताने आनंदोत्सव साजरा केला जात आहे. परंतु रामाला अभिप्रेत असलेलं राम राज्य देशात आणि राज्यात कुठे दिसतय का असा सवाल आमदार राेहित पवार (mla rohit pawar) यांनी उपस्थित केला. आमदार पवार यांनी पंढपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Maharashtra News)

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडी कार्यालयाने (Enforcement Directorate) नोटीस पाठवली आहे. येत्या बुधवारी रोहित पवार ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहेत. त्यापूर्वी पवार यांनी आज विठ्ठल रुक्मिणीचे मनोभावे दर्शन दर्शन घेतले. जे लोकशाहीचा आवाज दाबताहेत त्यांच्या विरोधात लढण्याचे बळ आणि ताकद द्यावी असे साकडे विठुरायाला घातल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.

पवार म्हणाले राजकीय द्वेषापोटी राज्य आणि केंद्र सरकारकडून कारवाई केली जात आहे. पण आम्ही त्यांच्या कारवाईला घाबरणार नाही. ईडीकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. चौकशीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. पण सत्ताधारी लोक कारवाईची भीती दाखवून आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माझ्याविरोधात सरकारकडून केली जाणारी कारवाई ही सूड भावनेतून केली जात असल्याची लोकांची देखील भावना आहे. त्यामुळं याबाबत मला पाठिंबा देताहेत आणि सरकारला सद्बुद्धी दे असे म्हणून लागले आहेत असेही पवार यांनी म्हटले.

राम राज्य दिसतय का ? राेहित पवार

आज देशभर रामलल्ला प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा केला जात आहे. परंतु रामाला अभिप्रेत असलेलं रामराज्य (ramrajya) देशात आणि राज्यात कुठे दिसतय का असा सवाल ही आमदार पवार यांनी उपस्थित केला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

Accident : कार- टेम्पोचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

Marathi News Live Updates : चेंबूरच्या आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Abhijeet Sawant Success Story : इंडियन आयडल जिंकून रात्रीत स्टार, बिग बॉस मराठी गाजवलं, कोट्यवधींच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिजीतचा संघर्षमय प्रवास, वाचा

SCROLL FOR NEXT