Kasaba By Election, Rohit Pawar On Kasba By Election
Kasaba By Election, Rohit Pawar On Kasba By Election saam tv
महाराष्ट्र

Kasba Bypoll Election : कसब्यातील पोटनिवडणुकीवरुन चंद्रकांत पाटील, राज ठाकरेंना राेहित पवारांचा टाेला

विश्वभूषण लिमये

Rohit Pawar On Kasba By Election : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (maharashtra navnirman sena) ताकद कसबा मतदारसंघात (kasba) असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना कसबा मतदारसंघाची पाेटनिवडणुक (kasba bypoll election) लढविण्याची इच्छा दिसून येत आहे. अर्थात त्यांचे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हे त्याबाबत निर्णय घेतील असे आमदार राेहित पवार यांनी साेलापूरात (solapur) नमूद केले. दरम्यान राज ठाकरेंची पाेटनिवडणुकीच्या भुमिका सातत्याने बदलत असते त्यामुळे ठाकरे स्टाईल काेठे तरी लुप्त हाेत आहे की काय असे वाटत असल्याचे आमदार पवार (rohit pawar) यांनी नमूद केले.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (mca) अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर पहिल्यांदाच सोलापुरातील स्टेडीयमवर राेहित पवार आले हाेते. तेथे पवार यांनी खेळाडूंसमवेत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पवार यांनी भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील आणि मनसे प्रमुख राज ठाकरेंवर टीकास्त्र साेडले.

कसबा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी टिळक कुटुंबियांनी उमेदवारी नाकारल्याची माहिती देताना केलेले विधान हस्यापद असल्याचे आमदार राेहित पवार यांनी नमूद केले. तज्ञांचे मते टिळक कुटुंबियांच्या विरोधात भाजपने उमेदवार दिला आहे. भाजपाने ओबीसी नेत्यांची ताकद कमी केली आणि टिळक कुटुंबियांना डावलून ओबीसी उमेदवाराला संधी दिली हे तज्ञांच मत आहे.

हे मत माझे नाही असेही पवार यांनी नमूद केले. मात्र आम्ही कोणाला उमेदवारी द्यायची यापेक्षा टिळक कुटुंबिय हे भाजपचे आहेत. मुक्ताताईंच्या कुटुंबातील आहेत. त्यामुळे टिळक कुटुंबातील व्यक्तीला संधी देण्याची जबाबदारी भाजपाची आहे असेही राेहित पवार यांनी म्हटलं.

राज ठाकरे यांच्या पाेटनिवडणुकीच्या भुमिकेवर राेहित पवार म्हणाले राज ठाकरे साहेबांनी दिलेला पत्र हरवलं का? कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडीला लिहिलंय पत्र, मात्र, पंढरपूर, कोल्हापूर आणि नांदेड पोटनिवडणूकीच्यावेळेस राज ठाकरेंनी बिनविरोध निवडणूकीसाठी पत्र का दिलं नाही किंवा त्यांच त्या वेळेच पत्र हरवलं का? असा सवाल पवार यांनी केला.

भाजप जेंव्हा रिंगणात उतरत तेंव्हा ते का पत्र देतात असं म्हणत राज ठाकरेंच्या भूमिकेवर पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. ते म्हणाले राज ठाकरेंची ओरिजनल स्टाईलवर भाजपाचा प्रभाव दिसतोय. कसाब विधानसभेत मनसेची ताकद आहे. त्यामुळे पार्टीचा विचार करायचा की भाजपाचे हे त्यांनी ठरावयाच आहे असे पवार यांनी नमूद केले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maval News: अंघोळीसाठी पाण्यात उतरले, पोहताना दम लागला; इंद्रायणी नदीत बुडून दोन भावंडांचा मृत्यू

WhatsApp Account Ban: व्हॉट्सअॅपकडून भारतात गेल्या वर्षी ७ कोटी अकाउंट्सवर बंदी; अहवालातून माहिती समोर

Chitra Wagh : "मी चारित्र्यवान कलावंत, माफी मागा नाहीतर...", 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना थेट इशारा

Hingoli Water Crisis: हिंगोली जिल्ह्यात भीषण पाणीबाणी; 500 गावांत शासनाच्या योजना निष्क्रिय, पाण्यासाठी नागरिकांची वणवण

Mumbai Market : मुंबईतील सर्वात स्वस्त कपड्यांचं मार्केट; स्टार्टींग रेंज फक्त २५० रुपये

SCROLL FOR NEXT