Rohit Patil and Suhas Babr Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra Politics: काय योगायोग! ३४ वर्षांपूर्वी 'बाप'माणसांची एकाच वेळी विधानभवनात एन्ट्री, आता त्यांच्या मुलांचीही ग्रँड एन्ट्री, फोटो व्हायरल

Rohit Patil and Suhas Babar entry into Vidhan Bhavan: आर. आर पाटील आणि अनिल बाबर यांच्याप्रमाणेच त्यांची मुलं रोहित पाटील आणि सुहास बाबर यांनीही आमदार म्हणून विधानभवनात एकत्र प्रवेश केला.

Bhagyashree Kamble

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

काय योगायोग आहे, असं आपण अनेपक्षित घडणाऱ्या घटनांवर बोलतो. योगायोग कुठून, कधी आणि कसा जुळून येईल सांगता येत नाही. आता राजकारणात घडलेला हा योगायोगच बघा. वडिलांप्रमाणे चिरंजीवांनीही प्रथमच आमदार म्हणून विधानभवनात एकत्र प्रवेश केला. १९९० साली दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर. आर पाटील आणि अनिल बाबर यांनी प्रथम आमदार झाल्यानंतर विधानभवनात एकत्र प्रवेश केला होता.

तसेच दोघांचे चिरंजीव रोहित पाटील आणि सुहास बाबर यांनी आज प्रथमच त्याच डॅशिंग अंदाजात विधानभवनात प्रवेश केला. त्यामुळे एक अनोखा योगायोग आणि १९९० सालची एकप्रकारे पुनरावृत्ती झाली असल्याचं बोललं जातंय. तासगाव आणि खानापूर आटपाडी ही अगदी शेजारची गावं. या मतदारसंघात आर. आर पाटील आणि अनिल बाबर हे दोघेही दमदार आमदार होते. मात्र, आज दोघेही हयात नाहीत. त्यांनी या मतदारसंघातील कामं चोखपणे बजावली. ज्याची दखल अख्ख्या महाराष्ट्राने घेतली आहे.

दिवंगत नेते आणि माजी मंत्री आर. आर पाटील आणि अनिल बाबर यांनी १९९० मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. तासगाव विधानसभा मतदारसंघातून आर. आर पाटील तर, खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून अनिल बाबर यांनी निवडणूक लढवून आमदारकीच्या विजयाची माळ गळ्यात घातली होती. त्यानंतर दोघांनी विधानभवनामध्ये एकत्रितच प्रवेश केला होता.

आज त्यांचेच वारसदार असलेले नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील आणि आमदार सुहास बाबर यांनी त्याच अंदाजात एकत्रित विधानभवनात प्रवेश केला. या दोघांच्या एकत्रित आगमनानंतर, आर. आर पाटील आणि अनिल बाबर यांची सगळ्यांना आठवण झाली. अनेकांनी सोशल मीडियावर तशा प्रतिक्रिया दिल्या. रोहित पाटील हे तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून तर सुहास बाबर हे खानापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून प्रथमच निवडून आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT