विनाशकाले विपरीत बुद्धी! पैशांच्या वाटपावरून दरोडेखोरांचा वाद; एक झाला फितूर लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

विनाशकाले विपरीत बुद्धी! पैशांच्या वाटपावरून दरोडेखोरांचा वाद; एक झाला फितूर

बुलडाणा अर्बन बँक दरोडा प्रकरण, तीन दरोडेखोरांपैकी एकाला एकूण रकमेपैकी अर्धी रक्कम हवी असल्याने, त्याने गोंधळ घालायला सुरवात केली आणि दरोडेखोरामध्ये वाद सुरू झाला.

लक्ष्मण सोळुंके

जालना : 28 ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील शहागड येथील बुलडाणा अर्बनच्या शाखेतून तीन आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून रोख रकमेसह सोन्याचे दागिने पळवले होते. 3 आरोपींनी हा दरोडा टाकला होता. ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेर्यात कैद झाली होती. या प्रकरणी जालन्यातील गोंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या दरोड्यातील 3 पैकी दोन आरोपींना पकडण्यात गेवराई पोलिसांना यश आलं आहे. गेवराई पोलिसांनी या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या असून जालन्यातील गोंदी पोलिसांकडे या आरोपींना पुढील तपासासाठी हस्तांतरीत करण्यात आलं आहे.

हे देखील पहा :

तीन दरोडेखोरांपैकी एकाला एकूण रकमेपैकी अर्धी रक्कम हवी असल्याने, त्याने गोंधळ घालायला सुरवात केली आणि दरोडेखोरामध्ये वाद सुरू झाला. या वादाची कुणकुण खबऱ्या मार्फत थेट गेवराईच्या साहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप काळे यांना लागली आणि क्षणाचा विलंब ही न करता त्यांनी आरोपीना मुद्देमालासह अटक केली. दरोड्यातील रकमेच्या वाटाघाटीवरून दरोडेखोरांमध्येच आपापसात वाद झाल्याने यातील दोन आरोपी गेवराई पोलीसांच्या गळाला लागल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी चोरीची लाखो रुपयांची रक्कम आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या बंदुकी एका गोणीत ठेऊन ही गोणी लाकडांच्या गंजीत दडवून ठेवल्याचं देखील गेवराई पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आलंय.

या आरोपींच्या ताब्यातून गेवराई पोलिसांनी 9 लाख 50 हजार रूपयांची रक्कम, 3 कोटी 42 लाख 17 हजार 711 रुपयांचे कर्जदारांचे बँकेत तारण ठेवलेले सोने असा एकूण 3 कोटी 51 लाख 67 हजार 711 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गोंदी पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. गेवराई पोलीसांच्या या धाडसी कारवाईचं सर्वत्र कौतुक होत असून पुढील तपास गोंदी पोलिस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, गेवराई पोलिसांनीच ही कारवाई केली असताना जालना पोलिसानी मात्र गेवराई मधून आपणच दोन्ही आरोपीना अटक केल्याचा दावा केला आहे. मात्र नेहमीच श्रेयासाठी झटणाऱ्या जालना पोलिसांनी हे आरोपी खरंच त्यांनीच अटक केली आहे का? याचा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या स्तरावरून व्हायला हवा तरच खरी कारवाई करणाऱ्या पोलिसांच मनोबल वाढेल हे नक्की.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT