क्राईम
क्राईम Saam Tv
महाराष्ट्र

लग्नाच्या अल्बममधील महिलांचे दागिने पाहून घातला दरोडा

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर ः तालुक्यातील बेलापूर परिसरात आज (शुक्रवारी) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धारधार चाकुचा धाक दाखवून दोन ठिकाणी जब्बरी चोरी केली. ही घटना नुकतीच उघडकीस आली. बेलापूर येथील गोशाळा परिसरात उदय खंडागळे यांच्या बंगल्यात चोरट्यांनी उचका पाचक करुन सुमारे १५ तोळे सोन्यासह रोख रक्कम व भगीरथ चिंतामणी यांच्या घरातून सुमारे २५ हजार रुपये चोरुन नेले.

चोरीचा प्रकार कळाल्यानंतर बेलापुर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत चोरटे तेथून पसार झाले होते. बेलापुर-श्रीरामपुर रस्ता परिसरात उदय खंडागळे यांचा बंगला आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी खंडागळे यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी घरातील लहान मुलीच्या गळ्याला धारधार चाकु लावुन धमकी दिली. त्यानंतर घरात उचकापाचक केली. त्यावेळी त्यांना किडूक मिडून हाती लागले. उचकापाचक करताना चोरट्यांच्या हाती त्या घरातील लग्नाचा अल्बम सापडला. त्या घरातील महिलांचे त्यांनी फोटो शोधले. लग्नात घातलेले दागिने त्या फोटोत होते. ते काढून देण्याची त्यांनी मागणी केली. त्यानंतर महिलांनी नाईलाजस्तव घरातील दागिने काढून दिले. ते १५ तोळे सोने व रोख रक्कम घेवून चोरटे पसार झाले.

काही वेळाने परिसरातील भगीरथ चिंतामणी यांच्या घराच्या लोखंडी दरवाजाचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. तेथेही उचकापाचक करुन सुमारे २५ हजार रुपये लुटले. त्यावेळी चिंतामणी यांचा मुलगा सोमनाथ याने एका चोरट्यासोबत झटापट केली. त्यावेळी चोरट्याने सोमनाथ यांच्या पायावर लोखंडी राँड मारला. सोमनाथने देखील चोरट्याला चोप दिल्याने चोरट्यांनी तेथून धूम ठोकली.

सोमनाथ यांनी पोलिसांना चोरीच्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र, चोरटे तोपर्यंत परिसरातून पसार झाले होते. आज (शुक्रवारी) सकाळी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाचे प्राचारण केले. तेव्हा श्वान पथकाने पहाणी करुन कुऱ्हे वस्ती रस्त्याच्या दिशेने माग दाखविला. तेथून चोरटे वाहनाद्वारे पसार झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनीदेखील घटनास्थळी भेट देवून चोरीच्या प्रकाराची माहिती घेतली. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अज्ञात चोरट्यांचा तपास सुरू केला आहे. चोरीच्या घटना वाढल्यामुळे बेलापुर परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackarey: उद्धव ठाकरे गेल्या १०वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा सवाल

Home Decor Idea : कमी खर्चात बर्ड थे पार्टीसाठी घर कसं सजवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

Raj Thackeray: '5 वर्ष राणे मुख्यमंत्री असते तर...', तो किस्सा सांगत राज ठाकरेंनी केलं नारायण राणे यांचं कौतुक

RCB Vs GT : आरसीबीच्या बॉलर्ससमोर गुजरात ढेर; बेंगळुरूसमोर १४७ धावांच लक्ष्य

Amruta Khanvilkar : चंद्राच्या घायाळ करणाऱ्या अदा; साडीत अमृताचे क्लासिक फोटोशूट

SCROLL FOR NEXT