Nitin Gadkari On Nagpur Butibori Road Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Butibori Road: नागपूर ते बुटीबोरी रस्ता होणार सहा पदरी, नितीन गडकरी यांची माहिती

Nagpur News: नागपूर शहराच्या वर्धा रोडवर स्थित एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपासून ते रिंग रोड जंक्शन, तसेच रिंग रोडपासून ते बुटीबोरीच्या उड्डाणपूलापर्यंतचा रस्ता सहा पदरी होणार : गडकरी

साम टिव्ही ब्युरो

Nitin Gadkari On Nagpur-Butibori Road:

नागपूर शहराच्या वर्धा रोडवर स्थित एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपासून ते रिंग रोड जंक्शन, तसेच रिंग रोडपासून ते बुटीबोरीच्या उड्डाणपूलापर्यंतचा रस्ता सहा पदरी होणार असून अमरावती रस्त्यावरील वाडीपासून ते कोंढाळीपर्यंतचा रस्ता सुद्धा सहा पदरी होणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर मध्ये दिली.

''मेट्रो स्टेशन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जामठा मेट्रो स्टेशन पासून खाली रस्ता वरती फ्लायओवर आणि त्यावरती मेट्रो अशी डबल डेकर रचना राहणार असून त्यामुळे बुटीबोरी पर्यंतचे अंतर कमी होईल'', अशीही माहिती त्यांनी दिली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नागपूर शहरासाठीच्या' नागपूर सिटी पॅकेज-१ अंतर्गत बुटोबोरी ते फेटरी चार पदरी रिंगरोड-बायपासचं लोकार्पण आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आरआरआर लॉन, हिंगणा रोड, आऊटर रिंगरोड येथे झाले. त्यावेळी गडकरी यांनी ही माहिती दिली आहे.  (Latest Marathi News)

हिंगणा आणि बुटीबोरी या दोन औद्योगिक वसाहतींना जोडणारा दुवा म्हणून हा नवा आउटर रिंग रोड योजनाबद्ध विकासासाठी सज्ज होईल या रोडच्या बाजूला लॉजिस्टिक पार्क राहणार आहेत .या आऊटर रिंग रोडने अमरावती रोड वर आल्यावर खालच्या अंडरपास वरून फेटरीपर्यंतचा रिंग रोड पूर्ण झाला असून हाच रिंग रोड पुढे कामठी आणि रिंग रोडला जोडण्यासाठीचे काम पुढच्या दोन महिन्यात पूर्ण होईल असे गडकरींनी यावेळी सांगितले.

जामठ्याच्या जवळ 8 हेक्‍टरवर देशातील पहिला 'बर्ड पार्क ' विकसित केला जाणार असून यामध्ये विविध फळांच्या जाती लावल्या जाणार आहेत त्यामुळे येथे पक्षी आपल्या नैसर्गिक सहवासात राहू शकतील याचप्रमाणे येथे सायकल ट्रॅक आणि कॉफी शॉप सुद्धा राहणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. हिंगणा शहराच्या योजनाबद्ध विकासासाठी येथील अतिक्रमण हटवून रस्ते रुंद करण्याची सूचना देखील त्यांनी यावेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Box Office Collection: कांताराची दिवाळीत बंपर कमाई; लवकरच पार करणार ६०० कोटींचा टप्पा

Sachin Pilgaonkar : महागुरू सचिनचा नवा दावा, माझं गाणं 'त्यांनी' ऐकलं अन् अखेरचा श्वास घेतला

Washim : गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ किलो गांजा जप्त

Sai Tamhankar Photos: खोल गळ्याच्या ब्लाऊजमध्ये सईचं खुललं सौंदर्य, फोटो तुम्हालाही आवडतील

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT