Amravati Ritesh Meshram Case Saam Tv
महाराष्ट्र

Ritesh Meshram Case: रितेश मेश्राम प्रकरणात मोठी कारवाई, हत्येचा गुन्हा दाखल झालेल्या ८ पोलिसांचे निलंबन

Amravati Ritesh Meshram Case: अमरावतीमध्ये रितेश मेश्राम या तरुणाचा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला होता. या प्ररणात ८ पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचे निलंबन करण्यात आले.

Priya More

अमरावतीच्या रितेश मेश्राम मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात चांदुररेल्वे पोलिस ठाण्यातील ८ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी ही मोठी कारवाई केली आहे. रितेश मेश्राम मृत्यू प्रकरणी दोषी असलेले तत्कालीन ठाणेदार अजय अहिरकर यांच्यावर कारवाईसाठी वरिष्ठांना प्रस्ताव सादर करण्यात आहे. न्यायालयीन चौकशी अहवालानंतर चांदूररेल्वे पोलिस स्टेशनमधील ८ पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध रविवारी हत्येचा गुन्हा दाखल झाला होता.

रितेश मेश्राम मृत्यू प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल झालेल्या ८ पोलिस कर्मचाऱ्याचे आज निलंबन करण्यात आले. अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी या सर्वांचे निलंबन केले. राजकुमार मुलामचंद जैन, विशाल मुकुंदराव रंगारी, अश्विनी शामरावजी आखरे, सरिता वैद्य, प्रविण रामदास मेश्राम, अलीम हकीम गवळी, अमोल अमृतराव घोडे, प्रशांत ढोके अशी निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. न्यायालयीन चौकशी अहवालात आरोपी रितेश मेश्राम यांच्या मृत्यूसाठी गार्ड इंचार्ज आणि गार्ड ड्युटीवर असलेले पोलिस अंमलदार दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील रितेश मेश्राम या तरुणाचा मृत्यू ५ जून २०२४ रोजी पोलिसांच्या ताब्यात झाल्याचे समोर आले होते. रितेशला संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, त्यानंतर त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेमध्ये सापडला. कुटुंबीयांनी पोलिसांवर मारहाणीचा आरोप करीत न्यायाची मागणी केली होती. या प्रकरणी अनुसूचित जाती आयोगाने स्वतः हस्तक्षेप करत सखोल चौकशी केली.

पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या वर्तणुकीमुळे रितेशचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक निष्कर्षानंतर आयोगाने न्यायालयासमोर अहवाल सादर केला. कोर्टाच्या आदेशानंतर अखेर पोलिस अधिकाऱ्यासह ८ अंमलदारांवर कलम ३०२ अंतर्गत रविवारी गुन्हा दाखल झाला. याच प्रकरणात आता ८ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे सेवा विस्कळीत

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT