Dengue in Maharashtra Saam tv
महाराष्ट्र

Dengue in Maharashtra: सावधान! ऑक्टोबर, नोव्हेंबर धोक्याचा, राज्यात डेंग्यू थैमान घालणार? 'ही' लक्षणे दिसताच घ्या वैद्यकीय सल्ला

Dengue Symptoms in Marathi: राज्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात डेंग्यूचा धोका वाढू शकतो.

Girish Nikam

सप्टेंबरमध्ये पाऊस कमी होतो. मात्र यावर्षीचा पावसाळा लांबला आहे. त्यामुळे अनेक आजारांचं प्रमाणही झपाट्याने वाढलं आहे. पावसाळा संपल्यानंतर अनेक ठिकाणी साचलेले पाणी तसेच राहते. यामुळे डास आणि घाणीचा प्रादुर्भाव जास्त होतो. अशा परिस्थितीत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो.

त्यातही डेंग्युचा धोका अधिक आहे. देशात दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होते. डेंग्यू हा डास चावल्यामुळे होतो. ज्यामुळे शरीरातील प्लेटलेट्स कमी होऊ लागतात, यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. योग्य उपचार केल्यास रुग्ण डेंग्यूतून बरा होतो, परंतु त्याचा प्रभाव त्या व्यक्तीवर फार काळ राहतो.

राज्यात सध्या मुंबईसह पुणे, नाशिक आणि इतर जिल्ह्यात डेंग्युच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. सिंगापूरमध्ये संशोधनात असे दिसून आले आहे की डेंग्यूच्या रुग्णांना कोविड-19 च्या तुलनेत हृदयविकाराचा धोका 55 टक्के जास्त आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की डेंग्यूमुळे प्लेटलेटची संख्या कमी झाल्यामुळे अवयव खराब होण्याचा धोका वाढतो. ज्यामुळे रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका तर वाढतोच, शिवाय न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या आजारांचा धोका 213 टक्क्यांनी वाढतो.

एडिस मादी डासाच्या चावण्याने हा आजार पसरतो. या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होऊ लागते. डेंग्यू झाल्यावर रुग्णाला ताप येणे, डोळे दुखणे, अंगदुखी, भूक न लागणे, उलटी होणे अशी लक्षणे दिसतात. तुम्हालाही अशी लक्षणे दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

पावसाळ्यात साथीच्या आजारांमध्ये वाढ होते. जून ते ऑगस्ट दरम्यान हिवताप, डेंग्यू, चिकूनगुनीया आणि लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. महापालिका प्रशासनही उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याचं चित्र आहे. जनजागृतीही केवळ कागदावरच आहे. नागरिकांनीच सतर्क राहुन आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT