Crime Saam TV
महाराष्ट्र

आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत टोळक्याची हुल्लडबाजी; १२५ जणांवर अ‍ॅट्रॉसिटी

शोभायात्रा मुख्य रस्त्यावर आली असता अचानक जवळ असलेल्या गल्लीतून शंभर ते सव्वाशे तरुणांनी शोभायात्रेत घुसून जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली.

गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी

अहमदनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देशभरात अभिवादन करण्यात आलं ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आलं होतं. मात्र, अहमदनगरच्या (Ahmednagar) संगमनेरमध्ये आंबेडकर जयंतीला गालबोट लागल्याचं समोर आल आहे. शहरातून निघालेल्या शोभायात्रेत शेकडो जणांच्या टोळक्यांनी शांततेत सुरू असलेल्या शोभायात्रेमध्ये धुडगूस  हुल्लडबाजी करत उत्साहात सुरू असलेल्या शोभायात्रेत तुफान घोषणा देण्यास सुरुवात केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते घटनास्थळी पोलीस (Police) दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.

संगमनेर (Sangamner) येथील संघर्ष तरुण मंडळाने सायंकाळी शोभायात्रेचे आयोजन केले होत सदरची शोभायात्रा मुख्य रस्त्यावरील श्रीकृष्ण मंदिराच्या परिसरात आली असता अचानक जवळ असलेल्या गल्लीतून शंभर ते सव्वाशे तरुणांनी शोभायात्रेत घुसून जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली.

सदरची घटना पोलिसांना कळताच घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक राहुल मदने दाखल होत शोभायात्रेत घुसलेल्या तरुणांना पोलिसांनी हुसकावले शोभायात्रा मार्गस्थ झाल्यानंतर CCTV आणि मोबाईलच्या आधारे धुडगूस घालणाऱ्या तरुणांची पोलिसांनी धरपकड सुरू केली पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतल असून १२५ तरुणावर अॅट्रॉसिटी अंतर्गत संगमनेर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Jagdish patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडलं झुरळ, कॅम्प परिसरातील हॉटेलमधील किळसवाणा प्रकार समोर

Maharashtra Live News Update : सामच्या बातमीनंतर धडगाव नगरपंचायत प्रशासनाला आली जाग

Parbhani : शेती मशागत करताना दुर्दैवी घटना; कोळपणी करताना विद्युत तारेला स्पर्श, शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Dark Circle Removal Tips: बर्फ लावल्याने खरचं डार्क सर्कल गायब होतात का? जाणून घ्या सत्य

नवी मुंबईत वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, ग्राहकांकडून प्रति तास ४ हजार घ्यायचे; पोलिसांनी 'असा' रचला सापळा

SCROLL FOR NEXT